New Delhi : केंद्र सरकारच्या (Central Government) पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून (PM Narendra Modi) आनंदाची बातमी आहे. आता पुरुष कर्मचारी देखील केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत त्यांचे आई-वडील आणि सासरच्या लोकांना लाभार्थी बनवू शकतात. यापूर्वी ही सुविधा फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. या नव्या आदेशानंतर महिला आणि पुरुष केंद्रीय कर्मचारी या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मोदी सरकारची ही योजना नेमकी काय आहे आणि केंद्र सरकारचे पुरुष कर्मचारी त्याचा कसा फायदा घेऊ शकतील याविषयी जाणून घेऊयात.


योजना नेमकी काय आहे?


आयुष्मान भारत प्रमाणे CGHS ही देखील भारत सरकारची एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे. याअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात रुग्णालयात उपचारांचा लाभ मिळतो. CGHS अंतर्गत कर्मचार्‍यांना विशेष उपचार, औषधे आणि मोफत आरोग्य तपासणी यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा खर्चही कमी होतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे जाते.


नवीन आदेशानंतर काय बदल झाले?


या नवीन अधिसूचनेसह, पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील किंवा सासू-सासरे यांना CGHS चे लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्याची संधी मिळाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा सासरचे लोक त्यांच्याबरोबर राहतात आणि त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, त्यांच्यासाठीही ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. यामुळे कौटुंबिक अभ्यासाची काळजी घेण्यास आणि भविष्यातील चिंता कमी करण्यास देखील मदत होईल.


कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?


केंद्र सरकारच्या CGHS या आरोग्य योजनेचा लाभ महिलांबरोबर पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी, विद्यमान आणि माजी खासदार, माजी राज्यपाल आणि नायब राज्यपाल, स्वातंत्र्य सैनिक, माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे वर्तमान आणि माजी न्यायाधीश, केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त पत्रकार, दिल्लीतील कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलीस, रेल्वे बोर्ड कर्मचारी आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


या योजनेत उपलब्ध सुविधा


या योजनेच्या लाभार्थ्यांना ओपीडीमधील उपचार आणि औषधांचा खर्च, शासकीय रुग्णालयातील उपचार सुविधा, कृत्रिम अवयवांसाठीचा खर्च, खासगी आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत खर्च होणारा पैसा, इत्यादींचा लाभ मिळतो.


महत्त्वाच्या बातम्या :


Opposition Meeting : मुंबईत होणार्‍या भाजप विरोधी आघाडी इंडियाच्या बैठकीची तारीख ठरली?