Rajasthan Election 2023 Survey : पुढील वर्षी 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha 2024) पार पडणार आहेत. त्याआधी काही राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये राजस्थानचादेखील (Rajasthan) समावेश आहे. राजस्थानमध्ये एबीपी न्यूजने सी व्होटरच्या सहकार्याने (ABP News C Voter Survey) ओपिनयन पोल सर्वेक्षण केले आहे. राजस्थान निवडणुकीत (Rajasthan) कोण मोठा पक्ष म्हणून उदयास येणार आणि सत्तेची खुर्ची कोणाला मिळणार याबाबत केलेल्या सर्वेक्षणाचे आश्चर्यकारक निकाल समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये भाजपला (BJP) पुन्हा एकदा विजयाची चव चाखायला मिळेल आणि काँग्रेसला (Congress) 78-88 जागांवर समाधान मानावे लागू शकते, म्हणजेच 2023 च्या निवडणुकीत काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागू शकते.


राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. या सर्वेक्षणानुसार विरोधी पक्ष भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते. भाजपला राजस्थानमध्ये 109-119 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 78-88 जागा मिळतील. इतर पक्षांना 1-5 जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत भाजपने सर्व 200 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. तर काँग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या.


राज्यातील सर्वात मोठा प्रश्न कोणता?


या सर्वेक्षणात राज्यातील सर्वात मोठा प्रश्नही विचारण्यात आला आहे. सर्वेक्षणात सहभागी लोकांपैकी 28 टक्के लोकांनी महागाई ही सर्वात मोठा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. याशिवाय 27 टक्के बेरोजगारी, 10 टक्के भ्रष्टाचार, 5 टक्के मूलभूत सुविधा आणि 30 टक्के इतर प्रमुख मुद्दा असल्याचे सांगितले.


मुख्यमंत्र्यांच्या कामावर जनता काय म्हणाली?


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर किती समाधानी आहेत, असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. यावर 41 टक्के लोकांनी आपण खूप समाधानी असल्याचे सांगितले. तर 35 टक्के लोकांनी ते कमी समाधानी असल्याचे सांगितले. तर 21 टक्के असमाधानी तर 3 टक्के लोकांनी माहिती नसल्याचे सांगितले.


मतांची टक्केवारी


राजस्थान निवडणुकीत भाजपाल तब्बल 46 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला 41 टक्क्यांच्या घरात मते मिळू शकतात.  तर 13 टक्के मते इतर पक्षांच्या खात्यात जाताना दिसत आहेत.


'सी व्होटर'ने एबीपी न्यूजसाठी राजस्थान निवडणुकीसाठी पहिला सर्वात मोठा ओपिनियन पोल केला आहे. या सर्वेक्षणात 14 हजार 85 लोकांशी संवाद साधण्यात आला आहे. यासोबतच राजस्थानच्या राजकारणातील सध्याच्या मुद्द्यांवरही झटपट सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 1 हजार 885 लोकांचे मत घेण्यात आले आहे. 25 जुलैपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात त्रुटी अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.