रायबरेली : युपीएच्या अध्या सोनिया गांधी बुधवारी रायबरेली या (12 जून) त्यांच्या लोकसभा मतदार संघात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीदेखील उपस्थित होत्या. सोनिया यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीयादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांना 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी मांडली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षाला मजबूत करण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्याचवेळी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी केली.

काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी युती करु नये, अशी मोठी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली. तसेच विधानसभेच्या 12 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक आहे, या पोटनिवडणुकीत पक्ष पूर्ण जोमाने काम करेल. कोणशीही युती करण्याची आवश्यकता नसल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, प्रियांका यांनी अतिथीगृहात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी बातचित केली. सर्वांचे म्हणणे ऐकले, मागण्या ऐकल्या. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून समन्वयकांकडून स्थानिक पातळीवरील माहिती घेतली.