दिल्ली : क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे शनिवारी राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आहे. यामध्ये ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा, क्रिकेटपटू मिताली राज, सुनिल क्षेत्री, ममप्रीत सिंह यांच्यासह 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच 35 अर्जुन पुरस्कार, 10 द्रोणाचार्य पुरस्कार आणि 5 जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 


क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राष्ट्रीय खेळ पुरस्कारांने सन्मानित केलं जातं. 


पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं


मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार: नीरज चोपड़ा (अॅथलेटिक्स), रवी कुमार दहिया (कुस्ती), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखारा (पॅरा शूटिंग), सुमित अंतिल (पॅरा अॅथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बैडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बैडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंह (हॉकी)


अर्जुन पुरस्कार: अरपिंदर सिंह (अॅथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (नेमबाजी), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंह (हॉकी), हरमनप्रीत सिंह (हॉकी), रूपिंदर पाल सिंह (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी), विरेंद्र लाकड़ा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंह (हॉकी), मनदीप सिंह (हॉकी), शमशेर सिंह (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंह (हॉकी), योगेश कथूनिया (पैरा एथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स), सुहाश यतिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधाना (पॅरा नेमबाजी), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (पॅरा तिरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)


द्रोणाचार्य पुरस्कार-  लाइफ टाईम श्रेणी - टी. पी. ऑसेफ(अॅथलेटिक्स), सरकार तलवार (क्रिकेट), सरपाल सिंह (हॉकी), आशान कुमार (कबड्डी), तपन कुमार पाणिग्रही (तैराकी)
नियमित श्रेणी: राधाकृष्णन नायर पी (अॅथलेटिक्स), संध्या गुरुंग(बॉक्सिंग), प्रीतम सिवाच (हॉकी), जय प्रकाश नौटियाल (पॅरा शूटिंग), सुब्रमण्यम रमन (टेबल टेनिस)


लाइफटाइम अचिव्हमेंटसाठी ध्यानचंद पुरस्कार - लेख केसी (बॉक्सिंग), अभिजीत कुंते (चेस), दविंदर सिंह गरचा (हॉकी), विकास कुमार (कबड्डी), सज्जन सिंह (कुस्ती)


राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे. 


संबंधित बातम्या :