नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, ""खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने  करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल." 

भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. 

 

काय आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरुप? 

देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची सुरुवात तीस वर्षांपूर्वी म्हणजे 1991-92 पासून करण्यात आली. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील चार वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो.

 बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू ठरला तर 2001 मध्ये नेमबाजपटू आणि ऑलिम्पिकवीर अभिनव बिंद्राला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार पटकावणारा अभिनव बिंद्रा आजवरचा सर्वात तरुण खेळाडू आहे.    

एक पदक, प्रमाणपत्र आणि 25  लाख रुपयांची रक्कम असं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं स्वरुप आहे. 2018 पर्यंत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची रक्कम 7.5 लाख रुपये होती.. 2018 पासून पुरस्काराच्या रकमेत वाढ करुन ती 25 लाख रुपये करण्यात आलीय.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मानकरी

1991-92 विश्वनाथन आनंद (बुद्धीबळ)1992-93 गीत सेठी बिलियर्ड्स 1993-94  होमी मोतीवाला नौकानयन 1993-94  पी के गर्ग  नौकानयन 1994-95 कर्णम मल्लेश्वरी भारोत्तोलन 1995-96 कुंजरानी देवी भारोत्तोलन 1996-97 लिएंडर पेस                  टेनिस 1997-98 सचिन तेंडुलकर क्रिकेट 1998-99 ज्योतिर्मयी सिकदर अॅथलेटिक्स1999-2000 धनराज पिल्ले हॉकी 2000-01 पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटन 2001 अभिनव बिंद्रा नेमबाजी2002 के एम बीनामोल अॅथलेटिक्स 2002 अंजली भागवत नेमबाजी 2003 अंजू बॉबी जॉर्ज अॅथलेटिक्स 2004 राज्यवर्धन सिंह राठौड निशानेबाजी 2005 पंकज आडवाणी बिलियर्ड्स आणि स्नूकर 2006 मानवजीत सिंह संधू नेमबाजी 2007 महेंद्र सिंह धोनी क्रिकेट 2008 कुणालाही पुरस्कार नाही2009 मेरी कोम  मुष्टीयुद्ध 2009 विजेंद्र सिंह  मुष्टीयुद्ध 2009 सुशील कुमार कुस्ती 2010 सायना नेहवाल बॅडमिंटन 2011 गगन नारंग  नेमबाजी2012 विजय कुमार नेमबाजी2012 योगेश्वर दत्त  कुस्ती2013 रंजन सोढी  नेमबाजी 2014 कुणालाही पुरस्कार नाही2015 सानिया मिर्झा टेनिस2016 पीवी सिंधू  बॅडमिंटन2016 दीपा कर्माकर जिमनॅस्टिक2016 जीतू राय  नेमबाजी2016 साक्षी मलिक कुस्ती2017 देवेन्द्र झाझरिया पॅरा अॅथलीट2017 सरदार सिंह  हॉकी2018 मीराबाई चानू भारोत्तोलन2018 विराट कोहली क्रिकेट2019 दीपा मलिक  पॅराऑलिम्पिक खेळ 2019 बजरंग पुनिया कुस्ती2020 रोहित शर्मा  क्रिकेट 2020 मरियप्पम टी पॅरा अॅथलीट2020 मनिका बत्रा  टेबल टेनिस 2020 विनेश फोगाट कुस्ती2020 रानी रामपाल हॉकी