मुंबई: नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या (Mahatma Gandhi) झाली नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी केलाय. तपास नीट झाला नाही, त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला असं सावरकर म्हणाले. फॉरेन्सिक तपासातून आपण हे वक्तव्य करत आहोत असं त्यांनी म्हटलं. गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दाडपलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.


रणजीत सावरकरांचा दावा काय? 


76 वर्षांपूर्वी अशी घटना घडली ज्यामुळे जगाचं राजकारण बदललं, त्याचा डाग सावरकर यांच्यावर लावला गेला. नथूराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केल्याचं सांगितलं गेलं. मी कपूर कमीशनचा अभ्यास सुरू केला. तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारला नाही. नथुराम गोडसे यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं नाही. नथुराम गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यातून महात्मा गांधी यांचा खून झाला नाही. पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा आहे. मी या सगळ्याचा अभ्यास केला.


2 फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही, मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता.


फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीबार आधारित आहे त्याचा फोटो जोडला आहे.


पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले आहेत. हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. पोलिसांनी तपास नीट केला नाही.


नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते हे 100 टक्के खरं, त्यांनी गोळ्या मारल्या हेही 100 टक्के खरं. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही.


नंतर या प्रकरणाचा तपास नीट झाला नाही.


गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला. 


हे प्रश्न लोकांनी उपस्थित केले पाहिजे. 


गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दाडपलेले पुरावे बाहेर काढावेत. 


मी कुठलाही स्पेकुलेशन करत नाही, मी हे फॉरेन्सिक तपासातून मांडत आहे. 


मी केंद्राकडे तपासाची मागणी करणार नाही, ही मागणी लोकांनी करावी.


या संबंधित पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. पण मी हे पुस्तक स्वतः प्रकाशित केलं. त्यावेळी अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणी प्रकाशनाला नकार दिला होता. 


ही बातमी वाचा: 



VIDEO : Ranjeet Savarkar : नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधीहत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा