नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत भाजपच्या तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह (देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर) भाजपची सुकाणू समिती उपस्थित आहे.
केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक पार पडल्यानंतर एक - दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपची पहिली यादी कधी येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, राज्यात भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे आधी युतीची घोषणा करुन मग उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता अधिक आहे.
आजच्या बैठकीत तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब झाले, तर उद्या (30 सप्टेंबर)किंवा 1 ऑक्टोबर रोजी युतीची घोषणा होईल. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षदेखील याचदरम्यान उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2019 06:04 PM (IST)
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -