मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. त्याला उत्तर देताना भाजपचे खासदार वरुण गांधींनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. कंगनाचे या विचारांना मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह असा सवाल त्यांनी विचारला होता. आता कंगनानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं असून गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक दिली असल्याचं तिनं म्हटलं आहे. 


एका मुलाखतील बोलताना कंगना रनौत म्हणाली होती की, 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भिक होती, खरं स्वांतत्र्य तर नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर म्हणजे 2014 साली मिळालं आहे. कंगनाच्या या वक्तव्याला उत्तर देताना भाजप नेते वरुण गांधी यांनी तिच्यावर टीका केली. वरुण गांधींनी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, "कधी महात्मा गांधींच्या तपस्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र आणि लाखो स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाचा तिरस्कार केला आहे. या विचाराला मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह?"


 






वरुण गांधींच्या या ट्वीटला कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ती म्हणते की, "मी सांगितलं आहे की 1857 मध्ये स्वातंत्र्याची पहिली लढाई झाली, ती दाबण्यात आली. त्यानंतर ब्रिटिशांनी आपले अत्याचार आणि क्रुरता वाढवली. त्यानंतर गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक मिळाली."



संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha