Madhya Pradesh Multai Court : विवाहानंतर पत्नी मला शारीरिक संबंध ठेऊ देत नाही, त्यामुळे मला घटस्फोट द्यायचा आहे, अशी याचिका पती न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने (Multai Court) याबाबत निकाल देताना विवाहानंतर पतीला शारीरिक (physical relations) संबंध ठेऊ न देणे ही क्रूरता असल्याचे म्हणत न्यायालयाने घटस्फोटाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले की, लग्नानंतर आपल्या पतीला शारिरीक सुखापासून वंचित ठेवणे, ही क्रूरता आहे. त्यामुळे न्यायालयाने पतीला एकप्रकारे दिलासाच दिला आहे. 


मुलताई न्यायालयात याप्रकरणी सुनावणी 


मध्य प्रदेशातील मुतलाई न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या प्रकरणात दोन्ही पक्षकारांची मतं विचारात घेऊन न्यायालयाने हा निर्णय घेताल. पतीची प्रकृती शारीरिक संबंध (physical relations) ठेवण्यासाठी ठीक असताना केवळ तो दिव्यांग आहे म्हणून चेष्टा करणे, ही क्रूरता असल्याचे न्यायालयाने म्हटले. 


दिव्यांग असल्याने नाकारले शारीरिक संबंध 


अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याबाबतचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी म्हटले की, त्यांचा विवाह 2018 मध्ये पार पडला होता. विवाहानंतर त्याची पत्नी त्याला शारीरिक सुखापासून वंचित ठेवत होती. पत्नी त्याला शारीरिक संबंध (physical relations) ठेऊ देत नव्हती. शिवाय तो दिव्यांग आहे, असे म्हणून त्याची चेष्टा करत होती. दोघांमधील वाद कुटुंबियांसमोरही अनेकदा आला होता. त्यानंतर कौटुंबिक वाद सोडवणाऱ्या केंद्राकडेही हे प्रकरण गेले होते. या प्रकरणी पतीचे मेडिकल चेकअप देखील करण्यात आले. 


पतीचे मेडिकल चेकअपही करण्यात आले


मेडिकल चेकअप केले असता पतीचे शारीरिक संबंध (physical relations) ठेवण्यासाठी आरोग्य व्यवस्थित आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. संपूर्ण प्रकरणातील दोन्ही पक्षकारांची मतं ऐकल्यानंतर द्वितीय अप्पर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. विवाहानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करु न देणे म्हणजे क्रूरता असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यानंतर पतीची घटस्फोटाची मागणी मंजूर करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नवरा मला मूल देऊ शकत नाही, बायकोवरही गंभीर आरोप; न्यायालय म्हणाले, वापरलेली भाषा सार्वजनिकरित्या वाचू शकत नाही!