Himachal Pradesh Operation Lotus : हिमाचल प्रदेशातील राजकीय संकटादरम्यान काँग्रेससाठी (Congress) आणखी एक वाईट बातमी येत आहे. हिमाचल सरकारचे कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिमला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मी पक्षाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आज मी एवढेच सांगू इच्छितो की, सध्या या सरकारमध्ये राहणे मला योग्य नाही. मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय घेतला आहे.


भाजपचे 15 आमदार विधानसभेतून निलंबित


हिमाचलमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह 15 सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाचे नेते सभागृहात घोषणाबाजी करत आहेत.


काँग्रेसचे बंडखोर आमदार भाजपसोबत


काँग्रेसचे संतप्त आमदार इंद्रदत्त लखनपालही विधानसभेच्या सभागृहात पोहोचले. दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आमदार रवी ठाकूर यांनी आपण भाजपसोबत असल्याचे सांगितले. सुधीर शर्मा, राजिंदर राणा या आमदारांनी मौन बाळगलं असलं तरी, आत जाताना रवी ठाकूर यांनी मागे फिरून आपण भाजपसोबत असल्याचे सांगितलं.


काँग्रेस पक्षाचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहतील : डीके शिवकुमार


काँग्रेसचे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे की, हायकमांडच्या सूचनेनुसार मी हिमाचल प्रदेशात पोहोचत आहे. याशिवाय, कोणत्याही अफवांमध्ये पडण्याची अजिबात गरज नाही, कारण मला विश्वास आहे की काँग्रेस पक्षाचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहतील आणि त्यांना दिलेल्या जनादेशाचे पालन करतील. मात्र, या प्रक्रियेत लोकशाही आणि सार्वजनिक जनादेशाला जाणीवपूर्वक चिरडण्याचा प्रयत्न करून भाजप किती प्रमाणात सत्ता मिळवणार आहे, हा प्रश्नचिन्ह आणि चिंतेचा विषय आहे.


भाजप आमदारांची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट


हिमाचल प्रदेश विधानसभेत सध्या गोंधळाचे वातावरण आहे. विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर अद्याप आपल्या जागेवरून उभे राहिलेले नाहीत. विधानसभेत भाजप आमदारांची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली. भाजप आमदारांना बाहेर जाण्यापासून वाचवण्यासाठी अपक्ष आमदारही आले आहेत. आमदार रणधीर शर्मा यांना काही झाले तर त्याला पोलिस जबाबदार असतील, असं भाजप आमदारांचं म्हणणं आहे. 


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Politics : राहुल गांधी कुठे तमाशा करतो, मी सांगू का; भाजप आणि काँग्रेस आमदारांची विधानसभेत खडाजंगी