Madhya Pradesh Election Opinion Polls and MP Assembly Election Survey : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये या वर्षाअखेर विधानसभा निवडणूक होत आहे. पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीअगोदर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वात मोठा ओपिनियन पोल केला आहे. कोणत्या राज्याचा कौल कुणाला, ते यातून स्पष्ट होणार आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेश भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. इथे भाजपला 40 टक्के, काँग्रेस 42 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळताना दिसत आहेत.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 117, भाजप 106 आणि इतर पक्षांना सात जागा मिळत आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना पसंती
राज्यातलं चित्र भाजपविरोधी असलं तरी केंद्रात मात्र जनतेला मोदी सरकारच हवं आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, लोकसभेत भाजपला मध्य प्रदेशात 46 टक्के, काँग्रेसला 39 टक्के आणि इतरांना 15 टक्के मिळत आहेत.
2019 ला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना 54 टक्के, तर राहुल गांधी यांना 25 टक्के जनतेने पसंती दिली आहे.
मध्य प्रदेशातील सद्यपरिस्थिती?
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 आणि लोकसभेच्या 29 जागा आहेत. 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 आणि काँग्रेसने 58 जागा मिळवल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 29 पैकी 27 जागांवर विजय मिळाला. शिवराज सिंह चौहान 29 नोव्हेंबर 2005 साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यांच्यापूर्वी बाबूलाल गौर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
सर्व्हे कसा झाला?
या सर्वेक्षणाअंतर्गत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 27 हजार 968 लोकांशी बातचित केली गेली. तीन राज्यांच्या सर्व 65 लोकसभा जागांवर एक जून ते 10 ऑगस्ट या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले.
संबंधित बातमी :
महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबतच : सूत्र
म. प्र. ओपिनियन पोल : काँग्रेसला बहुमत, भाजपच्या हातून राज्य जाणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2018 08:07 PM (IST)
पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीअगोदर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वात मोठा ओपिनियन पोल केला आहे. कोणत्या राज्याचा कौल कुणाला, ते यातून स्पष्ट होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -