नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) भाजपकडून (BJP) नवा नारा देण्यात आलाय. 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं' असा नवा नारा आता भाजपकडून दिला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात शुक्रवार 22 डिसेंबर पासून दिल्लीत (New Delhi) भाजपच्या बैठकांचं सत्र सुरु होणार आहे. त्याचसाठी दोन दिवसीय बैठकांच्या आयोजन करण्यात आलं असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P Nadda) यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार होतील. 


सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आलीये. भाजपने देखील लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून आता जोरदार नारेबाजीला देखील सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. 


भाजपकडून उमेदवारांची पहिला यादी कधी येणार?


दिल्लीत भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये विकसित भारत संकल्पच्या बरोबरच छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आलीये. खरतंर भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवलाय. पण तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसने बाजी मारली.


पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांच्या विधानसभा या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भाजपची लोकसभा निवडणुकांसाठीची पहिली यादी येऊ शकते. 


भाजपने आतापर्यंत काय नारे दिलेत?


पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर दोनदा बहुमत मिळवले आहे. 2014  मध्ये पक्षाने 'अच्छे दिन आने वाले हैं' असा नारा दिला होता. तर 2019 मध्ये भाजपने 'पुन्हा एकदा मोदी सरकार' असा नारा दिला. 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं' असा नवा नारा भाजपकडून देण्यात आलाय. तसेच 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजप हॅट्रीक मारणार असल्याचा दावा देखील सातत्याने पंतप्रधान मोदी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता काहीच दिवसात देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 


हेही वाचा : 


Ajit Pawar : पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, भूमिका बदलणार नाही : अजित पवार