Ratan tata : उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपली वाहन कंपनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णयही घेतला होता. 90 च्या दशकात इंडिका (Indica) फ्लॉप झाल्यानंतर रतन टाटा ते विकण्यासाठी अमेरिकेत गेले होतो. ही कंपनी फोर्डला विकण्याचा निर्णय झाला होता, पण तिथे असे काही घडले की त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय मागे घेतला. आज तीच टाटा मोटर्स कंपनी 2.41 लाख कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. आज टाटाची वाहने देशातील आवडता ब्रँड बनली आहेत. ईव्ही क्षेत्रात टाटा मोटर्स आघाडीवर आहे.


जर आपण गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून बोललो तर टाटा मोटर्स आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी 2023 हे वर्ष खूप चांगले आहे. चालू वर्षात कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे 90 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, आपण 90 च्या दशकात रतन टाटा यांना टाटा मोटर्स का विकायची होती? कंपनीची विक्री न करता ते अमेरिकेतून का परत आले? समजून घेऊयात सविस्तर माहिती.


रतन टाटांनी का घेतला होता टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय? 


90 च्या दशकात रतन टाटा यांनी टाटा मोटर्सच्या बॅनरखाली टाटा इंडिका लॉन्च केली. परंतू कार फ्लॉप झाली. प्रतिसाद खूपच वाईट होता. कंपनीला तोटा होऊ लागला. त्यानंतर रतन टाटा यांनी प्रवासी कारचा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी त्यांनी अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्ड मोटर्ससोबत काम केले. त्यासाठी ते बिल फोर्डशी बोलले आहेत. त्यावेळी बिल फोर्ड यांनी रतन टाटांची खिल्ली उडवली होती आणि म्हटले होते की, त्यांना या व्यवसायाबाबत काहीच माहिती नसताना त्यांनी हा व्यवसाय का सुरू केला? हा व्यवसाय विकत घेऊन टाटांवर उपकार करेन, असेही फोर्डने त्यावेळी म्हटलं होतं.


'त्या' घटनेनंतर टाटांचा नवा प्रवास सुरू... 


बिल फोर्डचे शब्द रतन टाटा यांना बाणासारखे टोचले. या बैठकीत रतन टाटाचा आपला व्यवसाय न विकता परत आले. त्यानंतर त्यांनी जगाला दाखवून दिले की, यशाची पहिली पायरी म्हणजे अपयश. टाटा मोटर्स आज कोणत्या स्थितीत आहे हे सांगण्याची गरज नाही. टाटा मोटर्स इंडियाने ऑटो क्षेत्रात विशेषत: प्रवासी वाहनांमध्ये मोठे नाव कमावले आहे. टाटा मोटर्स सतत ईव्हीवर लक्ष केंद्रित करत आहे. टाटा मोटर्सला माहीत आहे की, येत्या काही दिवसांत ती टेस्लासारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे.


टाटा मोटर्स गुंतवणूकदारांसाठी प्रचंड नफा कमवत आहे


2023 हे वर्ष टाटा मोटर्स आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम वर्ष ठरले आहे. कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सध्या कंपनीच्या समभागांनी विक्रमी पातळी गाठली आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या सुरुवातीला टाटा मोटर्सचा शेअर 400 रुपयांपेक्षा कमी होता. आज त्याची किंमत 700 रुपयांच्या पुढे गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची किंमत जवळपास 328 रुपयांनी वाढली आहे. याचा अर्थ टाटा मोटर्सचा गुंतवणूकदारांना खूप फायदा झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


टाटा समूह पाहणार 'या'शहराचा कारभार? शहराच्या विकासात टाटा समूहाचं मोठं योगदान