कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची विभागणी पाच झोनमध्ये
- रेड झोन
- ग्रीन झोन
- ऑरेंज झोन
- कन्टेंन्मेंट झोन
- बफर झोन
आणखी एक नवा झोन तयार करण्यात आल्यामुळे नक्की कोणत्या झोनमध्ये काय येणार आणि हे कोण ठरवणार, असे अनेक प्रश्न पडले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना एक पत्र पाठवलं असून त्यामध्ये झोनमध्ये करण्यात आलेल्या वर्गीकरणाबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्याचा अधिकार राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना असणार आहे. तर कन्टेंन्मेंट आणि बफर झोनचा निर्णय जिल्हा प्रशासन करणार आहे.
कन्टेंन्मेंट आणि बफर झोन
कन्टेंन्मेंट, बफर झोन हे रेड आणि ऑरेंज झोन अंतर्गत येतील. म्हणजेच, जिथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते, ते हे परिसर असणार आहेत. केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कन्टेंन्मेंट झोनचा निर्णय घेण्यात येईल.
कन्टेंन्मेंट झोनमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी?
- फक्त मेडिकल आणि घरगुती उपयोगाच्या सामांनांची दुकानं उघडणार
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील
- आरोग्य मंत्रालयाच्या गाइडलाइन्सचं काटेकोरपणे पालन करावं लागणार
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येईल
- परिसरातील सर्व रस्त्यावर नजर ठेवण्यात येईल
- चौकशी केल्याशिवाय कोणालाही येण्या-जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही
बफर झोनबाबत जाणून घ्या
- कन्टेंन्मेंट झोनच्या आसपासचा परिसर बफर झोन असणार आहे
- बफर झोनबाबत निर्णय जिल्हा प्रशासन करणार आहे.
- बफर झोन असलेल्या परिसरात अधिकाधिक तपासण्या करण्यात येणार
- आरोग्य सुविधांवर जोर देण्यात येईल
- संशयित प्रकरणांची जिल्हा कंट्रोल रुमला माहिती देण्यात येणार
- फेस मास्क, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करावं लागणार
- स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यात येईल
बफर झोनमध्ये संसर्ग वाढण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येतील. याव्यतिरिक्त केंद्राने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे अधिकार राज्यांकडे दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार परिस्थिती पाहून तेथील नियम कठोर किंवा शिथील करू शकणार आहे.
संबंधित बातम्या :
देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?
लॉकडाऊन 4 मध्ये फक्त स्पेशल ट्रेन, पार्सल आणि मालगाड्या धावणार : भारतीय रेल्वे
व्हायरल फोटोमागची दु:खद कहाणी, मुलाच्या मृत्यूपूर्वी शेवटचं पाहताही आलं नाही