मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याची घोषणा केली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कारण अत्यावश्यक गोष्टी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी "माझे पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये." असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनानंतर मीही सरकलोच. त्यामुळे मी पंतप्रधानांना कॉल केला. राज्यात काय उपाययोजना चालू आहेत, याची माहिती त्यांना दिली. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्या लागणार आहे. कारण, लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे, अशीही माहिती पंतप्रधान यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी दिली. जीवनावश्यक गोष्टीही सर्व सुरू राहणार आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. मात्र, हे संकट गंभीर आहे. त्यामुळे घरातचं बसा. मी वारंवार सांगतोय घरामध्ये बसा. कारण, जसं मोदी यांनी सांगितले तसं बाहेर पडलो तर संकट घरात येईल. हाच आपल्याला या रोगातून बाहेर पडण्याचा उपाय आहे. या संकटाला घराबाहेरुनच माघारी पाठवायचं आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यातील विमानअंतर्गत सेवा बंद झाल्या आहेत. विमानतळावर सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, कोणाची चुकून तपासणी राहिली असेल तर त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा.
व्हॉट्सअपवर मिळणार माहिती
कोरोना व्हायरस संदर्भात यापुढे सर्व माहिती व्हॉट्सअपवर मिळणार आहे. यासाठी व्हाट्सअप चॅट पॉट हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. +912026127394 या नंबरवर राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना बाबतची माहिती मिळणार आहे. सध्या इंग्रजी भाषेत ही माहिती मिळेल. मात्र, लवकरच ही माहिती मराठीत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे लोकांनी अजित घाबरुन जाऊ नये. आपल्याकडे पुरेसा अन्यधान्याचा साठा आहे. जीवनावश्यक गोष्टी कुठल्याही बंद राहणार नाही. फक्त सरकारच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यानी केलं.