Lightweight helmets News : बेळगावच्या वेगा ऑटोने जगातील सगळ्यात हलक्या वजनाची आणि ट्रिपल सर्टिफाईड हेल्मेट बाजारपेठेत (Lightweight helmets) आणले आहे. वेगाने  एक्सर एक्स कार्बन ही हलक्या वजनाची आणि सुरक्षेच्या दृष्टीने तीन प्रमाणपत्रे मिळवलेल्या हेल्मेटचे आज अनावरण करण्यात आले. बेळगावात एका शानदार कार्यक्रमात या  हेल्मेटचे अनावरण झाले. या हेल्मेटचे वजन केवळ 1050 ग्रॅम इतके आहे.

Continues below advertisement

सुरक्षेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही

बेळगावमध्ये डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलेल्या एक्सर एक्स कार्बन हेल्मेट ही जगातील सगळ्यात हलकी ट्रिपल सर्टिफाईड हेल्मेट ऑफ रोड  आहे. ही हेल्मेट तयार करण्यासाठी  कार्बन फायबरचा  वापर करण्यात आला आहे. या हेल्मेटला इ सी इ  22.06, डॉट  आणि आय एस आय  अशी तीन प्रमुख प्रमाणपत्रे मिळाली आहेत. हेल्मेट वजनाने हलकी असली तरी सुरक्षेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.

रायडिंग करताना हेल्मेटचे वजन कमी असल्यास मान आणि डोक्यावरचा ताण कमी होतो

ऑफ-रोड रायडिंगमध्ये हेल्मेटचे वजन हा रायडर्ससाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. दीर्घकाळ बाइक चालवताना किंवा खडतर  मार्गांवर रायडिंग करताना हेल्मेटचे वजन कमी असल्यास मान आणि डोक्यावरचा ताण कमी होण्यास मदत होते. याच पार्श्वभूमीवर एक्सरने एम  एक्स कार्बन  विकसित केले आहे. कार्बन फायबरचा योग्य पद्धतीने वापर, शेलची रचना आणि उत्पादन प्रक्रियेत केलेले तांत्रिक बदल यामुळे वजन कमी करण्यात यश मिळाले आहे.  त्याचवेळी आवश्यक सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यावरही भर देण्यात आला आहे. 

Continues below advertisement

 साहित्य, रचना आणि उत्पादन प्रक्रियेचा योग्य समन्वय राखण्याचा उद्देश

हेल्मेटचे बेळगावमध्येच डिझाइन करून  त्याची निर्मिती बेळगाव येथील वेगा ऑटोमध्ये करण्यात आली आहे. वेगा ऑटोचे  अध्यक्ष दिलीप चांडक यांनी कार्बन फायबरच्या क्षेत्रातील कंपनीच्या दीर्घ प्रवासाचा उल्लेख करत, भारतात विकसित आणि उत्पादित झालेले हे उत्पादन जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी क्षमतेचे उदाहरण असल्याचे सांगितले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गिरधारी चांडक यांनी हलकी हेल्मेट  तयार करण्यामागचा उद्देश केवळ वजन कमी करणे नव्हता; तर साहित्य, रचना आणि उत्पादन प्रक्रियेचा योग्य समन्वय साधून प्रमाणित सुरक्षा मानके कायम ठेवणे हे मुख्य आव्हान होते असे सांगितले. हेल्मेटच्या अनावरण प्रसंगी उत्तम चांडक, कुणाल चांडक, पार्थ चांडक आणि कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI