Indian women wealth News : संपत्ती ही प्रवाही आहे असं म्हटलं जातं. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत असते. या संपत्तीमध्ये सोने, चांदी, जागा, पैसे, घर, गाड्या यांचा समावेश असतो. दरम्यान, आपल्या देशात महिलांना देखील मोठ्या प्रमाणात संपत्तीचा वारसा मिळतो. याबाबत एक अअहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, पुढच्या 10 वर्षात भारतीय महिला या 73 लाख कोटी रुपयांच्या मालक बनू शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे. नेमका अहवाल काय? आणि काय माहिती दिली ते पाहुयात.
भारतात कौटुंबिक संपत्ती पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केली जाते. या संपत्तीमध्ये सोने, चांदी, घरे आणि गाड्या यांचा समावेश होतो. भारतीय घरांमध्ये महिलांना सर्वाधिक संपत्तीचा वारसा मिळतो? परिणामी, पुढील 10 वर्षांत भारतीय महिला अंदाजे 73 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालक बनतील. एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, बार्कलेज प्रायव्हेट बँक आणि एनक्यूब (Ncube) यांचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात याबाबतची माहिती उघड करण्यात आली आहे. पुढील दशकात भारतीय महिलांना किमान 73 लाख कोटी रुपयांच्या कौटुंबिक संपत्तीचा वारसा मिळू शकतो. या अहवालात सूचीबद्ध आणि खाजगी कंपन्यांमधील कौटुंबिक हिस्सेदारीसह इतर मालमत्तांचाही समावेश आहे.
गुंतवणुकीमध्ये महिला आघाडीवर
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, महिला केवळ संपत्तीच्या वारसदार नाहीत, तर त्या संपत्तीच्या गुंतवणुकीत आणि व्यवस्थापनातही सक्रिय भूमिका बजावतात. अंदाजे 86 टक्के महिला दीर्घकालीन संपत्तीच्या वाढीला प्राधान्य देतात. 66 टक्के महिला गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये स्वतः सहभागी होतात. जवळपास 85 टक्के महिला संतुलित गुंतवणूक धोरणाला प्राधान्य देतात, म्हणजेच, त्या उच्च परतावा मिळवताना जोखमीचा विचार करतात. त्याचबरोबर, 77 टक्के महिला त्यांच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिक संपत्ती सल्लागारांची मदत घेतात.
काय सांगतो अहवाल?
हा अहवाल उघड करतो की, ज्या महिलांना पूर्वी गुंतवणूक किंवा मालमत्तेबद्दल काहीही माहिती नव्हती, त्या आता त्यात खूप रस घेत आहेत. परिणामी, हे स्पष्ट आहे की भविष्यात संपत्तीवर महिलांचे वर्चस्व असेल. हा अहवाल थेट सूचित करतो की भविष्यात भारतीय कुटुंबांमधील कौटुंबिक संपत्तीचा मोठा हिस्सा महिलांच्या नावावर असेल.या वाढत्या संपत्तीसोबतच, आर्थिक ज्ञान, योग्य गुंतवणूक सल्ला आणि वारसा नियोजन हे महिलांसाठी तितकेच महत्त्वाचे असेल. महिलांनी प्रत्येक गुंतवणुकीशी संबंधित धोके आणि फायदे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक धोक्यांची जाणीव असली पाहिजे, जेणेकरून भविष्यात जेव्हा त्यांच्यावर या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, तेव्हा त्या प्रभावीपणे त्या पार पाडू शकतील.
