Congress President Election: पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये आंतरिक घडामोडींचा वेग आला आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होत. मात्र ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल,अशी चर्चा आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपद सापडल्यास सचिन पायलट हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री असू शकतात, अशीही चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान पायलट यांना विरोध करत गेहलोत गटाच्या 82 आमदारांनी बंडाचा इशारा देत राजीनामे लिहिले. आमदारांच्या या बंडाला गेहलोत जबाबदार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर पक्षाने अनुशासनहीनतेचा ठपका ठेवल्याचं बोललं जात आहे. यावरच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. कमलनाथ म्हणाले आहेत की, माझे दोन्ही नेत्यांशी (सचिन पायलट आणि अशोक गेलोत) चांगले संबंध असल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही. ते म्हणाले की, अनुशासनहीaनतेबाबत मी अशोक गेहलोत यांच्याशी बोललो असून दोषी नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.      


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कमलनाथ म्हणाले आहेत की, मी आधीही सांगितलं आहे, मी मध्य प्रदेश सोडून कुठेही जाणार नाही. निवडणुकीसाठी फक्त एक वर्ष शिल्लक आहे. ते म्हणाले की, जर मी केंद्रात कोणतीही जबाबदारी घेतली तर राज्यावरून माझं लक्ष विचलित होऊ शकतो. आता माझं लक्ष फक्त मध्य प्रदेशवर आहे.  


भाजपमध्ये निवडणूक का होत नाही? 


भाजपवर हल्लाबोल करताना कमलनाथ म्हणाले की, मोदीजींना विचारले पाहिजे की ते पक्षात नवीन नेतृत्व का येऊ देत नाहीत. त्यांनी विचारले की येडियुरप्पा नवीन नेतृत्वातून येतात का? त्यांनी विचारले की नड्डा यांची निवड कशी झाली. त्यांना पक्षाध्यक्ष निवडीतून करण्यात आले का, कोणी ठरवले? हे सत्य सर्वांसमोर आहे. भाजपला बेजबाबदार वक्तव्य कार्याची सवय झाली असल्याचं ते म्हणाले आहेत.  


राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर का आहे, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, मी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र त्यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून ही निवडणूक होत आहे. असं ते म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ankita Murder Case : 'रिसार्टमध्ये सुरु होती देहविक्री अन् अंमली पदार्थांचे अवैध धंदे'; हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्याचा दावा
PFI Ban: PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी