LIC Kanyadan Policy: जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवीन वर्षात गुंतवणुकीचे नियोजन विचार करण्यासाठी महत्वाची माहिती आहे. मुलीच्या लग्नाची चिंता करणाऱ्यांसाठी एलआयसीनं (LIC) खास कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे. या पॉलिसीला (LIC Policy) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा उद्देश मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांना बचतीचे साधन उपलब्ध करून देणे आहे. तर, या पॉलिसीबाबत नेमक्या कोणत्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, या पॉलिसीचा फायदा काय? जाणून घेऊया. 


या पॉलिसीसाठी तुमच्या मुलीची वय कमीतकमी वर्ष आणि पालकांचं वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावा लागणार आहे. मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुबियांना 20 लाख रुपये आणि आकस्मिक मृत्यू झाल्यास 5 लाख मिळतील. 


ही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील
एलआयसीची कन्यादान पॉलिसी उघडण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो देणे आवश्यक आहे. याशिवाय, स्वाक्षरी केलेला अर्ज आणि जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


किती पैसे जमा करायचे? 
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज 121 रुपये म्हणजेच दरमहा 3600 रुपये जमा करावे लागतील. हा प्रीमियम पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 27 लाख रुपये मिळतील.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha