LIC IPO: एलआयसीचा IPO या आर्थीक वर्षात येण्याची शक्यता कमी ABP Majha

Continues below advertisement

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी अशी ओळख असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसीचा IPO चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमी आहे. कारण मूल्यांकनाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि त्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो अशी माहिती आयपीओच्या तयारीत गुंतलेल्या एका मर्चंट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. मूल्यांकनाचं काम पूर्ण झाल्यानंतरही आयपीओशी संबंधित अनेक नियामक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. याबाबत सचिव तुहिनकांत पांडे यांनी ट्विट करून एलआयसीच्या आयपीओसाठी तयारी सुरू आहे आणि हा आयपीओ 2021-22 च्या जानेवारी-मार्च या तिमाहीत लॉन्च करण्यात येईल, असा दावा केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram