LIC IPO: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) आयपीओची जोरदार तयारी सुरू आहे. एलआयसीचा शेअर मार्च 2022 पर्यंत स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी सांगितले की, एलआयसीच्या आयपीओची तयारी जोरात सुरू आहे. आणि त्याला खात्री आहे की, मार्च 2022 पर्यंत एलआयसी स्टॉक एक्स्चेंजवर निश्चितपणे सूचीबद्ध होईल.


सेबीकडे लवकरच DHRP दाखल होणार


सरकार लवकरच LIC IPO संदर्भात SEBI कडे DHRP ( Draft Red Herring Prospectus) दाखल करू शकते. DHRP जानेवारी 2022 मध्ये सेबीकडे दाखल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार या आर्थिक वर्षाच्या अखेरीस एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. IPO व्यवस्थापनासाठी 10 मर्चंट बँकर्सचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 


एलआयसीला किती पैसे मिळतील?


एलआयसीच्या अध्यक्षांनी सांगितले की, सरकार एलआयसीला किती रक्कम देते यावर अवलंबून असेल. एलआयसीला भांडवलाची गरज असेल तर सरकार त्याची गरज नक्कीच पूर्ण करेल.


एलआयसीच्या आयपीओमुळे भांडवली बाजाराचा विस्तार होण्याची शक्यता


LIC च्या IPO चा काही भाग पॉलिसी धारकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. एलआयसी पॉलिसीधारक त्यासाठी अर्ज करू शकतात. एलआयसीच्या आयपीओसाठी नवीन डिमॅट खाती उघडल्यास देशाच्या भांडवली बाजाराला चालना मिळण्याची शक्यता आहे. सध्या देशात सुमारे 6 कोटी डिमॅट खाती आहेत. एलआयसीच्या ग्राहकांची संख्या 25 कोटींच्या जवळपास असेल. त्यानुसार एलआयसीचा आयपीओ आला तर संपूर्ण भांडवली बाजाराला नवा विस्तार देण्यात हा आयपीओ यशस्वी होऊ शकतो.


संबंधित वृत्त :


Multibagger Stock Tips: 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांच्याजवळील 'हा' स्टॉक 125 टक्क्यांनी वधारला


Multibagger stocks: आयटी क्षेत्रातील 'या' स्टॉकने दीड वर्षात एक लाखाचे केले 15 लाख रुपये


Multibagger Stock 2021: या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल! सहा महिन्यांत 108.93 टक्के परतावा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha