ISRO PSLV C-52 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) या वर्षीच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने (PSLV)-C52 चे प्रक्षेपण केले. या उपग्रहासह इतर दोन लहान उपग्रहदेखील होते. सकाळी 5.59 वाजता पीएसएलव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले.
इस्रोने सांगितले की पीएसएलव्ही C52 ची रचना 1,710 किलो EOS-04 उपग्रह 529 किमीच्या सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवण्यासाठी केली आहे. PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत. EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे.
या उपग्रहांचा काय होणार फायदा?
EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे. कृषी, वनीकरण आणि वृक्षारोपण, मातीची आर्द्रता आणि जलविज्ञान आणि पुराची स्थितीबाबत माहिती देण्यासह हवामान परिस्थितीतीबाबतही माहिती देण्यास सक्षम असणार आहे. भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचा (IIST) InspireSat-1 हा उपग्रहदेखील PSLV सह अंतराळात प्रक्षेपित करणार आला. हा उपग्रह कोलोरॅडोमधील बोल्डर विद्यापीठातील वायुमंडलीय आणि अंतराळ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.
जानेवारीत इस्रोच्या नव्या प्रमुखांची निवड
जानेवारी महिन्यात रॉकेट वैज्ञानिक एस. सोमनाथ यांची इस्रोचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एस. सोमनाथ यांनी GSLV Mk-III लाँचरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, येणाऱ्या पिढींच्या गरजा ओळखून भारतीय अंतराळ कार्यक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे. अंतराळ संशोधन आणि मोहिमेसाठी असलेला निधी हा सध्याच्या 15,000-16,000 कोटींवरून 20,000-50,000 कोटींपर्यंत वाढवण्याची गरज असून केवळ सरकारी निधी किंवा पाठिंब्याने होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Smartphone Tips : तुमचा जुना Android स्मार्टफोन विकण्यापूर्वी या 'पाच' गोष्टी करा
- Digital Payment Tips : UPI, NEFT आणि IMPS वर व्यवहार अयशस्वी झाल्यास 'या' पद्धतींनी पैसै परत मिळवा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha