Coronavirus Cases Today in India: देशात हळूहळू कमी होणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 876 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 98 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 568 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 97 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.


सक्रिय रुग्णांची संख्या


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 32 हजार 811 एवढी आहे. दरम्यान, काल देशात 4 हजार 722 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुले मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 5 लाख 16 हजार 72 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 24 लाख 50 हजार 55 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.


 


आतापर्यंत 180 कोटींहून अधिक लसींचे डोस 


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींचे 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल 18 लाख 92 हजार 143 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर देशात आतापर्यंत 180 कोटी 60 लाख 93 हजार 107 लसींचे डोस देण्यात आले आहेत. 





आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना लसीकरण


आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचं लसीकरण करण्‍यात येणार आहे. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे. लाभार्थ्‍यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्‍या अंतराने देण्‍यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून 12 ते 14 या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरु होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे.  एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.  Corbevax ही लस मुलांना दिली जाणार असून दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असणार आहे. याबाबतीत गाईडलाईन्स सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. देशभरात 12 ते 14 वर्षातील 7.74 कोटी मुलं आहेत. यांच्या लसीकरणासाठी  CoWIN अॅप  वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ही लस सर्वांना मोफत दिली जाणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: