Lalit Modi : आयपीएलचा माजी अध्यक्ष आणि देशाला बुडवून परदेशात फरार झालेला ललित मोदीने आपला भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला आहे. ललित मोदीला भारतीय तपास यंत्रणांनी आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. ललित मोदी पॅसिफिक महासागरातील वानुआतु (Vanuatu) या बेट देशाचे नागरिकत्व घेतले आहे. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की, 'ललित मोदी यांनी पासपोर्ट सोडण्यासाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडे अर्ज केला आहे. विद्यमान नियम आणि कार्यपद्धतीत तपासणी केली जाईल.


ते पुढे म्हणाले की, 'आम्हाला हे देखील माहित आहे की ललित मोदीने वानुआतुचे नागरिकत्व घेतले आहे. कायद्यानुसार आवश्यकतेनुसार आम्ही त्यांच्याविरुद्ध खटले चालवत आहोत.' भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष असताना ललित मोदीवर बोलीतील अनियमितता आणि मनी लाँड्रिंग तसेच परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 (फेमा) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. ललित मोदी मुंबईत एकदाच आयकर आणि ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत चौकशीत सहभागी झाले होते. तो देश सोडून मे 2010 मध्ये यूकेला पळून गेला.






काय होतं प्रकरण?


आयपीएल सुरू होण्याच्या मागे ललित मोदींचा हात होता. आज ती जागतिक क्रीडा क्षेत्रातील एक मोठी संस्था बनली आहे. 2009 मध्ये, भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे, आयपीएल दक्षिण आफ्रिकेत स्थानांतरित करावे लागले. 2010 च्या आयपीएल फायनलनंतर लगेचच, पुणे आणि कोची या दोन नवीन फ्रँचायझींच्या बोलीमध्ये अनियमितता, अनुशासनहीनता आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली ललित मोदीला बीसीसीआयमधून निलंबित करण्यात आले.


ललित मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि कार्यालयातून अनधिकृतपणे निधी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. अलीकडेच 2025 च्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मोदीने आपल्या नवीन मैत्रिणी रायम बोरीबद्दल सांगितले तेव्हा ते चर्चेत आले. त्याने तिच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आणि लिहिले की त्यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आहे. 2022 मध्ये, तो बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे प्रकाशझोतात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या