Lala Lajpat Rai: भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक धडाडीचे आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या लाला लजपत राय यांची आज जन्मतिथी आहे. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 साली पंजाबमधील मोंगा या जिल्ह्यात झाला. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना 'पंजाब केसरी' या नावाने ओळखले जाते. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली, त्यामध्ये लाला लजपत राय यांची प्रमुख भूमिका होती.
लाला लजपत राय हे पेशाने वकील होते. वकिली करताना ते आर्य समाजाच्या संपर्कात आले आणि पुढे आयुष्यभर जोडले गेले. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सोबतीने त्यांनी आर्य समाजाचा प्रसार केला. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावत त्यांनी काँग्रेसच्या कार्यात मोठं योगदान दिलं. लाल लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल या त्रयींना लाल-बाल-पाल म्हटलं जातंय. या तिघांनी ब्रिटिशांविरोधात प्रखर लढा दिला. भारतीय राजकारणात एक राजकारणी, वकील आणि लेखक या रुपात त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.
असहकार आंदोलनात भाग
स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतलेल्या लाला लजपत राय यांना ब्रिटिशांनी म्यानमारच्या तुरुंगात धाडलं. तिथून सुटका झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं कार्य सुरु ठेवलं. काही काळानंतर ते भारतात आले आणि महात्मा गांधींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतला. ते भारतभर लोकप्रिय असले तरी पंजाबमध्ये त्यांचा शब्द अंतिम ठरणारा असायचा.
1919 च्या भारत सरकारच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी 1928 साली भारतात सायमन कमिशन आले होते. त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्याचा निषेध करण्यासाठी देशभर आंदोलन करण्यात आले. पंजाबमधील या आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांच्याकडं आलं. त्यावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर 18 दिवसांनी 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला. नंतर त्यांच्या हत्येचा बदला भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी सॉन्डर्सला ठार मारुन घेतला.
पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक
लाला लजपत राय यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या रुपात पूर्णपणे भारतीय मालकीची असणारी देशातील पहिली स्वदेशी बँकेची स्थापन केली. त्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
Swami Vivekanand birth anniversary: जगाला धर्माचा खरा अर्थ सांगणारे स्वामी विवेकानंद