Lakhimpur Kheri News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या हिंसक घटनेत मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या शोकसभेला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा उपस्थित होत्या. लखीमपूर हिंसाचारात मारले गेलेले चार शेतकरी आणि पत्रकार रमण कश्यप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज टिकुनियामध्ये शोकसभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लखीमपूर खेरीच्या टिकुनियामध्ये प्रियांका गांधी वाड्रा, राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा, यूपी काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू दाखल झाले. त्याचवेळी अकाली दलातील मनजिंदर सिंह सिरसा हेही आले होते. संयुक्त किसान मोर्चाने या नेत्यांचे आभार मानले. पण, त्यांना मंचावर येऊ दिले नाही.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा यांची चौकशी सुरू
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे विशेष तपास पथक (एसआयटी) कसून चौकशी करत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आशिष मिश्राला पोलीस कोठडी देण्यात आली.
वरिष्ठ अभियोजन अधिकारी (एसपीओ) एसपी यादव यांनी सोमवारी सांगितले की, आशिष मिश्राला 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यासाठी शनिवारी न्यायालयात (मुख्य न्यायदंडाधिकारी) अर्ज करण्यात आला होता, त्यावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान सुनावणी केली. त्याला पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनी सांगितले की, आशिष मिश्रा यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यांना चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून त्रास दिला जाणार नाही. यादव यांनी असेही सांगितले की यावेळी त्यांचे वकील उपस्थित राहतील.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर आशिष मिश्राला शनिवारी अटक केली आणि मध्यरात्रीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जेथे त्याला लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. एसआयटीचे प्रमुख असलेले पोलिस उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उपेंद्र अग्रवाल यांनी शनिवारी रात्री मिश्रा यांच्या अटकेनंतर पत्रकारांना सांगितले, "मिश्रा यांनी पोलिसांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली नाहीत आणि तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. "लखीमपूर खेरी येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण मारले गेले.