Lakhimpur Farmers Death Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. आशिष मिश्रांवर लागलेले आरोप सिद्धा करण्यासाठी आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्रांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. तसेच एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले. यानंतर मुदत संपण्याचा एक दिवस आधीच आशिष मिश्रा यांनी रविवारी आत्मसमर्पण केलं.


गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील टिकुनिया गावात ही घटना घडली होती. यामध्ये थार गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं होतं. ही गाडी आशिष मिश्रा यांची असल्याचा आरोप आहे.


शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप
गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान थार गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं होतं. आशिष मिश्रा यांच्यावर हत्येसह अनेक गंभीर कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आशिष मिश्रा यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, त्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द केला होता.


आशिष मिश्रांवर आरोप काय? 


केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा 'टेनी' यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर 4 शेतकऱ्यांना थार जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने 5000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ही घटना सुनियोजित कट असल्याचे एसआयटीने म्हटले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :