Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा कहर कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,483 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी दिवसभरात 1,970 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 636 झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 636
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 636 इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरात देशात 1,970 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 622 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 23 हजार 311 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत 187 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात देशात 22 लाख 83 हजार 224 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 187 कोटी 95 लाख 76 हजार 423 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Elon Musk Buy Twitter : एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक, 44 अब्ज डॉलरचा करार
- Rajasthan Temple Demolition : राजस्थानमधील पुरातन मंदिर पाडण्यावर सरकारची मोठी कारवाई, मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिले 'हे' आदेश
- Trending News : आनंद महिंद्रांनी एलॉन मस्कना दाखवली 'भारतीय देशी टेस्ला', सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
- Russia Ukraine War : मारियुपोलमध्ये बुचापेक्षा मोठ्या नरसंहार, सॅटेलाईफ फोटमध्ये आढळल्या 200 पेक्षा जास्त कबरी