Kshama Bindu sologamy marriage: रोज सकाळी जर तुम्ही कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफार्म ओपन केल्यावर तु्म्ही काय पाहिलं असं तुम्हाला तर तुम्ही एकच सांगाल की मित्र मैत्रीणी किंवा सहकार्यांच्या लग्नाचे फोटो. याच दरम्यान सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाची चर्चा देखील सुरु होती आणि त्या लग्नाला सोलोगॅमी मॅरेज असं म्हटलं गेलं. गुजरातच्या क्षमा बिंदूने मी स्वत:शीच लग्न करते आहे असं जाहीर केलं आणि सगळ्यांना धक्का बसला होता. आज (9जून)तोच भारतातला पहिला आगळावेगळा विवाह पार पडला.


सोलोगॅमी मॅरेज म्हणजे काय?


या लग्नाला सोलोलॅमी मॅरेज म्हणतात ज्यात माणूस स्वत:शीच लग्न करतो. भारतात खरंतर हे सगळं नवीनच प्रकरण आहे. गुजरातची क्षमा बिंदू हिने स्वत:शीच लग्न केलं आहे .तशा प्रकारची पत्रिका आणि बाकी सगळी तयारी देखील तिने केली होती. सोलोगॅमी म्हणजे स्वत:शीच लग्न करणे. यात ना कोणी राजकुमार असतो, ना वरात येते, ना नवरदेव असतो. सगळे विधी त्या एकाच व्यक्तीने पुर्ण करायचे असतात. भारतात हा विवाह पहिल्यांदाच झाला त्यामुळे या विवाहाची जोरदार चर्चा सुरु झाली. हा विवाह एक वेगळी मानसिकता दर्शवते आहे. स्वकेंद्रित असणे, स्वत:चा विचार करणे आणि स्वत:ला स्वातंत्र्य देणे आणि अर्थात आत्मनिर्भर बनवणे याकडे लक्ष देणारा हा विवाह आहे. समाजाचं बदलतं रुप आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न हा सोलोगॅमी विवाह करतोय. क्षमा बिंदू ही 24 वर्षांची आहे. वडिल साऊथ आफ्रिकेत नोकरी करतात आणि आई हैद्राबादमध्ये राहते. ती स्वत: एका प्रायव्हेट कंपनीत रिक्रुटमेंट ऑफिसर आहे. सोलोगॅमी म्हणजे स्वत:शीच विवाह करणे आणि पॉलीगॅमी म्हणजे आपला साधारण विवाह.


याआधी देखील असे विवाह पार पडले आहेत का?
'सेक्स इन द सीटी' या कार्यक्रमात या विवाहाला जास्त प्राधान्य देण्यात आलं होतं. 1993 मध्ये पहिल्यांना असा सोलोगॅमी विवाह पार पडला होता.वयाच्या 40 व्या वर्षी लेंडा बेकर यांनी हा विवाह केला होता.लाॅस एन्ज्ल्समध्ये ती डेंटिस्ट होती. त्यानंतर 1996 मध्ये एका बास्केट बॉल प्लेअरने देखील असा विवाह केला होता. ब्राझीलची मॉडेल  क्रिस गॅलेरा हिने 33 व्या वर्षी  सोलोगॅमी विवाह केला मात्र ३ महिन्यातच तिने स्वत: सोबत डिवाॅर्स सुद्धा घेतला कारण ती एका पुरुषाच्या पडली होची.  आतापर्यंत 100 पेक्षा जास्त अशा प्रकारचे विवाह झाले आहेत. मात्र भारतातला हा पहिलाच विवाह होता.


सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
या सगळ्यावरुन सोशल मीडियात दोन प्रकारचे गट निर्माण झाले आहे. स्वत:वर प्रेम करण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं नाही आहे, असं पहिल्या गटाचं म्हणणं आहे. भारतात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी विवाह केला नाही आहे आणि गेले कित्येक वर्ष झाले ते एकटेच राहत आहे. तर दुसऱ्या गटाचं या उलट मत आहे. ते म्हणतात,  क्षमाचं हे पाऊल आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. स्वत:वर प्रेम करणं, स्वत:कडे लक्ष देणं, स्वत:ची स्वप्न पु्र्ण करणं याकडे अनेक जण दुर्लक्ष करयायत मात्र क्षमाच्या या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. या सगळ्यात तिच्या आई-वडिलांचा मात्र पाठिंबा आहे, ती सुखी रहावी आणि आनंदी रहावी असं तिचे आई वडिल म्हणतात. त्यामुळे थाटामाटात तिने हा विवाह केला. 


या विवाहाबाबत कायदा काय सांगतो?
कायदे अभ्यासक असीम सरोदे  म्हणतात, या प्रकारच्या विवाहाला काही कायदे मान्यता नाही आहे किंवा याबाबत अशी कोणती तरतूद नाही. मात्र या वागण्यामुळे समाजाला त्रास होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. विवाह हा प्रत्येकाचा व्यक्तीगत प्रश्न आहे, त्यांना कशापद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहे. मोदी सुद्धा स्वत:वर प्रेम करतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वत:वर प्रेम करण्याचा हक्क आहेच .मात्र स्वत:शीच विवाह करणे ही मला टोकाची भूमिका वाटते.