केरळ विधानसभा निवडणुका : 'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन भाजपच्या वतीने केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. लवकरच भाजपच्या वतीनं याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ई श्रीधरन यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. मेट्रो मॅनच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीधरन यांची लोकप्रियता पक्षासाठी केरळ निवडणुकांध्ये महत्त्वाची ठरणार आहे.


देशासाठी सर्वात योग्य लीडर्सपैकी एक मोदी : श्रीधरन


2014 च्या लोकसभा निवडणुकांआधी ई श्रीधरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले की, मोदी देशातील सर्वात योग्य लीडर्सपैकी एक आहेत. त्यांच्या हातून देशाचं भविष्य उत्तम होऊ शकतं. असं मानलं जात आहे की, ई श्रीधरन यांनी खूप दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं होतं. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर ते म्हणाले की, "भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय एका दिवसांत घेतलेला नाही. मला राज्यासाठी काम करायचं आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करत आहे. केरळ सरकारच्या मेट्रो प्रोजेक्टसाठी कंसलटेंसीसुद्धा आता मी बंद करणार आहे."


ई श्रीधरन यांच्या नावावर दिल्ली मेट्रोसह पहिल्या फ्रॅट कॉरिडोरला वेळेआधी पूर्ण करण्याचं श्रेय आहे. ई श्रीधरन यांना 2001 मध्ये पद्म श्री आणि 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. फ्रान्स सरकारनेही ई श्रीधरन यांनी 2005 मध्ये सर्वोच्च नागरिक सन्मान देऊन सन्मानित केलं होतं. एवढंच नाहीतर अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मॅगझिनने त्यांना एशिया हिरो या नावाने सन्मानित केलं होतं


कोण आहेत मेट्रो मॅन ई श्रीधरन?


श्रीधरन यांचा जन्म 12 जून 1932 रोजी केरळच्या पलक्कडमध्ये झाला होता. त्यांचं कुटुंब मूळचं पलक्कडच्या करुकपुथुरचं. ई श्रीधरन यांनी सिविल इंजिनिअरिंगची डिग्री आंध्रप्रदेशच्या काकीनाड येथील सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमधून घेतली. त्यानंतर ते इंडियन रेल्वे सर्विसमध्ये काम करु लागले.


दिल्ली मेट्रो, कोच्ची मेट्रो, लखनौ मेट्रोला ई श्रीधरन यांनी अपल्या सेवा दिल्या आहेत. साधारणपणे असं मानलं जातं की, राजकीय निवृत्तीचं वय नसतं. ई श्रीधरन यांचं 88 व्या वर्षी राजकीय क्षेत्रात पदार्पण करणं आणि भाजपकडून केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असणं केरळ निवडणुकांमध्ये कितपत महत्त्वाचं ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :