नवी दिल्ली: अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी पोस्टल बॅलेटच्या आधारे आपला मताधिकार नोंदवू शकतात असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. वृद्ध आणि दिव्यांग लोकांच्या व्यतिरिक्त रेल्वे, नागरी उड्डान सेवेतील कर्मचारी यांचाही या सेवेत समावेश करण्यात आला आहे.


पश्चिम बंगालच्या निवडणूकीत आता रंगत यायला सुरुवात झाली असून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या राजकीय सभांचा धडाका सुरु केलाय. या आधी तृणमूलच्या ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा झाल्या आहेत. मंगळवारी भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यांनी राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल असा दावा केला आहे.


Congress | बंगालच्या आघाडीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान, जी-23 गटाच्या आनंद शर्मांची जाहीर टीका


येत्या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल आणि भाजपमध्ये लढत होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात तृणमूलच्या अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने भाजपही या शर्यतीत आघाडीवर दिसत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या पाच राज्यांच्या निवडणुकांना सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. या पाच राज्यापैकी पश्चिम बंगालवर सर्व देशवासीयांची नजर आहे. 2 मे रोजी ईव्हीएममधून येणारा निकाल बंगालचं राजकीय भवितव्यावर ठरवणार आहे.


दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं जी निवडणूकपूर्व आघाडी केली आहे त्यावर पक्षाचेच ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी जाहीरपणे टीका केली आहे. आनंद शर्मा हे सोनिया गांधींना पक्षाच्या अवस्थेबद्दल पत्र लिहिणाऱ्या जी23 गटाचे एक महत्वाचे सदस्य. बंगालमध्ये काँग्रेस-डावे- आयएसएफ अशा तीन पक्षांची एकत्रित आघाडी झालीय. त्यात आयएसएफला सोबत घेण्यावरुन आनंद शर्मांनी नाराजी व्यक्त केलीय.


2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती. काँग्रेस 44, डावी आघाडी 26 आणि भाजपला फक्त 3 जागांवर विजय मिळाला होता. अन्य पक्ष आणि अपक्षांनी 10 जागा जिंकल्या होत्या. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 आहे.


ABP News C-Voter Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींना जनतेचा कौल; भाजप मोठी मुसंडी मारणार?