मुंबई : केरळमधील (Kerala News) कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. . दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सांगितले की, "स्पेशल सेल गुप्तचर संस्थांच्या सतत संपर्कात आहे आणि कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. गर्दीच्या ठिकाणी देखील सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आलीये. तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


दिल्लीशिवाय मुंबईतही हाय अलर्ट देण्यात आला आहे.  ज्यूंच्या धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोचीमध्ये कोचीमध्ये झालेल्या स्फोटानंतर नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) आणि काउंटर टेरर एटीसीची टीम घटनास्थळी रवाना झाली. या स्फोटामागे आयईडीचा हात असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. 


 कोची येथे ख्रिश्चन समुदायाच्या प्रार्थना सभेत झालेला बॉम्बस्फोट ही हृदयद्रावक घटना असल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी म्हटले. केरळमध्ये घडणाऱ्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी देखील याबाबत चर्चा केली. 


मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?


कोची बॉम्बस्फोटावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेबाबत तपशील गोळा करत आहोत. सर्व वरिष्ठ अधिकारी एर्नाकुलममध्ये आहेत. डीजीपी घटनास्थळी रवाना झाले आहेत. ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली गेली आहे. तसेच यासंदर्भात आम्ही पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील संवाद साधलाय. त्यांचा तपास सुरु आहे, तपासाअंती योग्य माहिती मिळेल. 










 नेमंक काय घडलं?


 केरळमध्ये  एका ख्रिश्चन मेळाव्यात मोठा स्फोट  झाला . स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळली. प्राथमिक माहितीनुसार, राज्याच्या एर्नाकुलममधील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका सभेदरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. 


हेही वाचा : 


Kerala Blast: केरळमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू, 35 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती