पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसारच या मेडिटेशन गुंफांची बांधणी करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिरापासून एक किलोमीटर उंचावर मंदाकिनी नदीच्या किनारी या गुंफा आहेत. केदारनाथमध्ये नेहरु गिर्यारोहण संस्थेने बांधलेल्या रुद्र मेडिटेशन गुंफांना प्रसिद्धी देण्यासाठी गेल्या वर्षी गढवाल मंडळ विकास निगम (जीएमव्हीएन)ने निवासाच्या किमतीमध्ये कपात केली, तर काही अटीही शिथिल केल्या.
सुरुवातीला या गुंफांची किंमत प्रतिदिन तीन हजार रुपये होती. मात्र बुकिंग सुरु झाल्यानंतरही वातावरण थंड असूनही पर्यटकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं गढवाल मंडळ विकास निगमचे महाव्यवस्थापक बीएल राणा यांनी सांगितलं.
Modi in Kedarnath | निकालाआधी केदारनाथ बाबाच्या दरबारात 'नमो नमो' | स्पेशल रिपोर्ट
विशेष म्हणजे, सुरुवातीला किमान तीन दिवसांसाठी या गुंफेचं बुकिंग करणं अनिवार्य होतं. यावर्षी ही अट हटवण्यात आली आहे. गुंफा मेडिटेशनसाठी असल्यामुळे असल्यामुळे केवळ एकच व्यक्ती एका वेळी राहू शकते. महाराष्ट्रातील जय शाह हे या गुंफेत राहिलेले पहिले पर्यटक आहेत. शाह तीन दिवस या ठिकाणी राहिले होते.
रुद्र गुंफेत काय काय?
वीज, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतागृह. गुंफेचा बाह्य भाग दगडापासून तयार करण्यात आला आहे, तर दरवाजा लाकडी आहे. पाच मीटर उंच आणि तीन मीटर रुंद अशी ही गुंफा आहे.
पर्यटकांना नाश्ता, लंच आणि डिनरची सुविधा देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या आवडीनुसार दिवसातून दोन वेळा गरम चहाही दिला जातो. दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस तुमच्या सेवेत एक कर्मचारी हजर असतो.
या मेडिटेशन सेंटरची संकल्पना ताणतणावापासून दूर राहण्यासाठी एकांतात राहण्याची आहे. मात्र गरजेसाठी गुंफेत फोनची सुविधा उपलब्ध आहे.
रुद्र गुंफेची वैशिष्ट्यं
-समुद्रपातळीपासून 12 हजार फूट उंचीवर गुंफा
-केदारनाथ मंदिरापासून एक किलोमीटर उंचावर मंदाकिनी नदीच्या किनारी
-गुंफेच्या बांधणीसाठी साडेआठ लाखांचा खर्च
- वीज, खाणं आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, फोनचीही सुविधा
- पाच मीटर उंच आणि तीन मीटर रुंद दगडी गुंफा, लाकडी दरवाजा