Uttarakhand Helicopter Crash : उत्तराखंडमध्ये मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघात झाला आहे. केदारनाथमध्ये सर्वत्र दाट धुके पसरले आहे. त्यामुळं हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचा अंदाज आहे. मात्र खराब हवामानामुळे अपघात होण्याची ही पहिली वेळ नसून या अगोदर देखील अनेक अपघात झाले आहेत.
केदारनाथमध्ये सर्वात मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना ही 25 जून 2013 साली घडली होती. केदारनाथ ढगफुटी घटनेवेळी बचावकार्य करत असताना हवाई दलाचे एमआय-17 या हेलिकॉप्टरला अपघात झाला. गौरीकुंड आणि रामवाडाच्या दरम्यान हा अपघात घडला होता. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं होतं. पायलट आणि कोपायलटयसह वीस जणांचा मृत्यू झाला.
2010 - केदारनाथमध्ये (Kedarnath) एका खासगी हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता.
2013- 21 जूनला भारतीय सैन्याचे एमआय 17 नावाचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि रामवाडाच्या दरम्यान दाट धुक्यामुळे कोसळलं होतं. यामध्ये पायलट, कोपायलटसह 20 जणांचा मृत्यू झाला.
2013 - 24 जुलैला केदारनाथ येथील घाटीमध्ये एक हेलिकॉप्टरतता अपघात झाला. या अपघातात कोपायलट आणि इंजिनिअरचा मृत्यू झाला होता
2018- तीन एप्रिलला एमआई-17 विद्युत तारांमध्ये अडकल्याने कोसळले (Helicopter Crash) होते. सुदैवाने सर्व प्रवासी वाचले
2019- केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होतं. प्रवाशांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग जमिनीवर आदळल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह सहा प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती.
संबंधित बातम्या: