Congress President Election : काँग्रेसचा (Congress) नवीन अध्यक्ष कोण असणार हे उद्या (19 ऑक्टोबर) समजणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे दोन नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत देशभरातील 9 हजार 500 हून अधिक काँग्रेस प्रतिनिधींनी अध्यक्षपदासाठी मतदान केलं. या निवडणुकीत माझा विजय होईल असा विश्वास असल्याचे मत शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. तर ही मैत्रीपूर्ण लढत होती असं मत खर्गे यांनी व्यक्त केले आहे. 


निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक झाली, मधुसूदन मिस्त्रींचा दावा


पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, निवडणुकीचे निकाल 19 ऑक्टोबरला लागणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक झाली आहे. मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणूक प्रक्रियेवर समाधान व्यक्त केलं आहे. निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्यासाठी सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे ज्या राज्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. तिथे कोणत्याही प्रतिकूल घटना घडल्या नाहीत. ही एक मोठी उपलब्धी आहे. निवडणुका खुल्या प्रक्रियेत आणि शांततेत पार पडल्याते मिस्त्री म्हणाले. नवीन CWC साठी मतदान होणार का? असे मधुसूदन मिस्त्री यांना विचारले असता ते म्हणाले की, ते नवीन कॉंग्रेस अध्यक्ष आणि पक्षाच्या पूर्ण अधिवेशनाच्या निर्णयावर अवलंबून असेल. दुसरीकडे, मधुसून मिस्त्री यांनी निवडणुकीबाबतचा त्यांचा अनुभव खूप चांगला असल्याचे ते म्हणाले.


मतदानानंतर खर्गे नेमकं काय म्हणाले?


काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी बंगळुरुमध्ये सांगितले की, शशी थरूर यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मी देखील थरुर यांना शुभेच्छा दिल्याचे खर्गे म्हणाले. भावी पिढ्यांसाठी एक मजबूत आणि चांगले राष्ट्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसला बळ देण्यासाठी आम्ही दोघेही मैत्रीपूर्ण पद्धतीनं लढत आहोत असे खर्गे यावेळी म्हणाले.


मतदानानंतर शशी थरुर नेमकं काय म्हणाले?


तिरुअनंतपुरममध्ये, शशी थरूर म्हणाले की, त्यांना विजयाचा विश्वास आहे. भारताला मजबूत काँग्रेसची गरज आहे. मी काँग्रेस आणि भारतासाठी लढलो, माझ्या राजकीय भविष्यासाठी नाही. मी इथे एक सक्षम पर्याय म्हणून आलो आहे. मी परिवर्तनासाठी उभा असल्याचे मत यावेळी शशी थरुर यांनी व्यक्त केले.


महत्त्वाच्या बातम्या:


Congress : काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्रातून 547 जणांनी तर देशभरातून 96 टक्के मतदारांनी बजावला अधिकार