श्रीनगर : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरात घडलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या श्रीनगरची परिस्थिती नियंत्रणात असली तरी संचारबंदी कायम आहे.
यामुळे अमरनाथ यात्रा आजही सुरु होऊ शकलेली नाही. दहशतवादी बुरहानच्या खात्म्यानंतर फुटिरतावादी नेत्यांनी कालपासून काश्मीरात धुडगूस घातला आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारुन दंगलखोरांनी वाहनांवर दगडफेक केली.
सध्या प्रशासनानं श्रीनगरमध्ये जवानांची अधिकची कुमक उतरवली असून, शहरातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.