Kartarpur Corridor : 1947 साली झालेल्या फाळणीमुळे दोन दोशच वेगळे झाले नाही तर अनेक लोकांना त्यांच्या कुटुंबापासून देखील दूर केले. परंतु, आता कर्तारपूर कॉरिडॉरवर कुटुंबापासून दूर गेलेले लोक भेटत आहेत. दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील लोकांच्या भेटीगाठी अनेकवेळा होत आहेत. कर्तारपूरमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. तब्बल 75 वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झालेले भाऊ-बहीण कॉरिडॉरवर भेटले आहेत. यावेळी एकमेकंना पाहताच दोघांनीही आश्रू अनावर झाले. पाकिस्तानचे पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


गुलाम अब्बास शाह यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भारतातील पंजाबमधील रहिवासी अमरजित सिंग यांनी त्यांची बहीण कुलसूम यांची कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये भेट घेतली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर 75 वर्षांनी हे दोघे एकमेकांना भेटले. दोन्ही भाऊ-बहिणींनी एकमेकांना पाहिले त्यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. 






या भेटीबाबत कुलसुम अख्तर सांगतात की,  त्यांचे कुटुंब 1947 मध्ये जालंधरमधून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. परंतु त्यांचे एक भाऊ आणि बहीण पंजाबमध्येच राहिले. फाळणीनंतर त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला. भारतात राहणाऱ्या आपल्या भावंडांबद्दल बोलताना त्याची आई नेहमी रडायची. आपल्या भावाला भेटण्याच्या सर्व आशा संपल्या होत्या. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी पाकिस्तानात आलेल्या एका मित्राशी केलेल्या संभाषणात त्यांच्या मुलांचा उल्लेख केला होता, त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला आणि नुकतीच आमची भावंडांची भेट झाली.  


कर्तारपूर कॉरिडॉर हा दोन्ही देशांतील विभक्त लोकांना जोडत आहे. गेल्या महिन्यात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनापूर्वी  दोन भाऊ देखील कॉरिडॉरवर भेटले होते. यातील सिका हा मूळचा भारताचा असून त्याचा भाऊ सादिक खान हा पाकिस्तानचा आहे. त्यावेळी झालेल्या दंगलीत सिक्काची बहीण आणि वडील मारले गेले. हा धक्का त्याच्या आईला सहन न झाल्याने तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सादिक त्यावेळी 10 वर्षांचा होता.