Karnataka News : देरलकट्टेचा राहिवासी असलेल्या एम.ए. मोहम्मद यांच्या ईमानदारीची सध्या जोरदार चर्चा आहे. 35 वर्षांपूर्वी मूदिगेरे तालुक्यातील कोटिगेहार या गावात एका कामाच्या निमित्ताने एम.ए. मोहम्मद हे तिथे आले होते. दरम्यान, यावेळी गावातून परतत असताना भारत त्यांनी मच्छी आणि कडुबू चा आस्वाद घेतला होता. मात्र, हॉटेलमध्ये असलेल्या गर्दीमुळे त्यांना बिल देता आले नव्हते. गावात पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी विचार केला की, नंतर कोटिगेहार येथे आल्यानंतर आपण हे बिल देऊ..मात्र, त्यानंतर त्यांचे या गावात येणे झालेच नाही.
35 वर्षांनंतर बिल दिलं
मोहम्मद याने हॉटेचलं बिल दिलं नाही, या गोष्टीला बरेच वर्षे झाले होते. या दरम्यान, शनिवारी ते कामाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोटिगेहार पोहोचले होते. तेव्हा त्यांना त्यांची जुनी चूक लक्षात आली. त्यावेळी थोडाही वेळ न लावता, ते हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी सुरुवातीला जेवण केलं. हॉटेल आजही तिथेच होते. मात्र, हॉटेल मालकाचा मुलगा कारभार पाहात होता.
माफी मागून दाखवली ईमानदारी
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मोहम्मद यांनी अजीज यांच्याशी 35 वर्षांपूर्वीच्या बिल न देण्याच्या कृतीबाबत माफी मागितली. यावेळी अजीज आश्चर्यचकित झाले कारण यापूर्वी त्यांनी असा प्रकार कधीही ऐकला नव्हता. मोहम्मद यांनी जुने बिल चुकवले सोबतच त्यांनी पुन्हा एकदा या हॉटेलमध्ये जेवण केले. हॉटेलचे बिल चुकवल्यानंतर त्यांच्या मनाला चांगलं वाटलं.
'इमानदार' पठ्ठ्याची जगभरात चर्चा!
मोहम्मद यांची ही इमानदारी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्या प्रामाणिकपणा आणि नैतिकतेबाबत चर्चा करत आहेत. त्यांनी 35 वर्षांनंतरही आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या इमानदारीची जगभरात चर्चा सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या