Rahul Gandhi Shivjayanti 2025 नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaj Maharaj) यांची आज 395 वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील एक्सवर पोस्ट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मात्र शिवजयंतीनिमित्त ट्विट करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिल्याचा दावा भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. 

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विट करताना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे. हा महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातील लोकांचा अपमान आहे. जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमी देशातील आणि महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत-नकळत अनादर व्यक्त करत असतात, त्यातील हा प्रकार आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. राहुल गांधी यांनी ट्विट मागे घ्यावं, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा पहिलाच टास्क; हर्षवर्धन सपकाळ विरोधकांना म्हणाले...

राहुल गांधींच्या एक्स पोस्टवरुन विरोधकांनी राहुल गांधींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींचा बचाव करत त्यांच्या एक्सपोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांना अभिवादन न करता विरोधकांनी राहुल गांधींच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी राजकारण सुरु केलं आहे. हा खेळ काही विरोधकांचा नवा नाही, पंडित जवारलाल नेहरू यांच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचे काम करण्यात आले होते. राहुल गांधींच्या ट्विटचं गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो आहे. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांचा आदर करतो, हा त्यांच्या मागचा भाव आहे. त्यामुळे विरोधकांनी ध चा मा करु नये, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

राहुल गांधींचं संपूर्ण ट्विट-

 राहुल गांधींनी शिवरायांचा अपमान केला- अतुल भातखळकर

ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेच जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे.  हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींचा निषेधही केला आहे.

संबंधित बातमी:

Narendra Modi On Shivjayanti 2025: माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीय...; शिवजयंतीनिमित्त नरेंद्र मोदींची मराठीतून पोस्ट

नेमकं प्रकरण काय?, VIDEO: