सत्ता न आल्याने काँग्रेसने आणखी एक राज्य गमावल्याचं दिसत होतं. मात्र दुपारनंतर पुन्हा काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी केल्याने सध्या हे राज्य राखल्याचं चित्र आहे.
पंजाब हे एकमेव मोठं राज्य काँग्रेसच्या ताब्यात आहे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पहिलाच पराभव आहे. त्यामुळे राहुल गांधी पहिल्याच परीक्षेत नापास झाल्याचं चित्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मे रोजी प्रचारादरम्यान कर्नाटकातील शिमोगामध्ये केलेलं वक्तव्य केलं होतं. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष केवळ पीपीपी म्हणजे पंजाब, पुद्दुचेरी आणि परिवार एवढाच उरणार आहे, असं मोदी म्हणाले होते.
काँग्रेसच्या हातात मिझोराम, पंजाब आणि पुद्दुचेरी ही तीन राज्य आहेत. व्होट शेअरवर नजर टाकली तर काँग्रेसचं सध्या केवळ 2.5 टक्के लोकसंख्येवर राज्य आहे.
‘काँग्रेसमुक्त’ भारत
मोदींनी दिलेला काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिवसेंदिवस खरा होत आहे. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आतापर्यंत 21 राज्यांमध्ये निवडणूक झाली. यापैकी 14 राज्यांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली. भाजप आणि एनडीएने 2014 नंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय या राज्यांमध्ये विजय मिळवला. इतर सहा राज्यांमध्ये भाजप 2014 पूर्वीपासनच सत्तेत होती. बहुतांश निवडणुकांमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव केला.
या राज्यांमध्ये विरोधी पक्ष
सध्या ओदिशामध्ये बीजेडी, केरळमध्ये डावे, तेलंगणात टीआरएस, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी, तामिळनाडूत एआयएडीएमके, दिल्लीत आम आदमी पक्ष सत्तेत आहे. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसपेक्षा इतर विरोधी पक्षांची जास्त राज्यात सत्ता आहे.
आगामी निवडणुकांसाठी भाजपला फायदा
कर्नाटकातील विजयासोबत भाजपने पुढील निवडणुकांचा मार्गही सुकर केला असल्याचं काहींचं मत आहे. यामुळे भाजपसाठी 2019 च्या निवडणुकीचा मार्ग अधिक सुलभ होईल, असं बोललं जातं. यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुका होतील, ज्यामध्ये कर्नाटकच्या निकालाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल. दक्षिणेत भाजपला पाय रोवण्यात आतापर्यंत अपयश आलं आहे. मात्र कर्नाटकात बहुमत मिळवून भाजपने दक्षिणेत पाय रोवले आहेत.
संबंधित बातम्या :