कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live Update: कर्नाटक विधानसभेवर कुणाचा झेंडा हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काँग्रेसने सुरुवातीला आघाडी तर घेतली, मात्र मुख्यमंत्री सिद्धरामैय्या जवळपास साडे अकरा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. (सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत)


सिद्धरामैय्या बदामी आणि चामुंडेश्वरी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. यापैकी चामुंडेश्वरी मतदारसंघात ते मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. तर जेडीएसचा उमेदवार आघाडीवर आहे.

कर्नाटकात 224 पैकी 222 जागांवर निवडणूक होत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 112 आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान पार पडलं होतं. यंदा 72.13 टक्के मतदान झाल्यामुळे कर्नाटकचा गड काँग्रेस राखणार की भाजप सत्ता काबीज करणार हे काही क्षणात स्पष्ट होईल.

एबीपी माझावर या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून  दिवसभर पाहू शकता. यामध्ये सुपरफास्ट निकालासोबत तज्ज्ञांचं विश्लेषणही असणार आहे.

* राहुल गांधींसमोर आव्हान

दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक मोठं आव्हान असणार आहे. तसंच कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता असल्याने तीही राखण्याचं आव्हान राहुल यांच्यासमोर आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

तर भाजपने बी एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. येडियुरप्पा यांनी यापूर्वी भाजपला 2008 साली सत्ता मिळवून दिली होती.

* त्रिशंकू परिस्थिती

मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष किंगमेकरच्या भूमिका निभावू शकतो.

संबंधित बातम्या :

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live: कर्नाटक त्रिशंकूच्या दिशेने


कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live : कर्नाटकात सत्ता कोणाची?