Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) 10 मे रोजी मतदान झालं. उद्या म्हणजे 13 मे रोजी या निवडणुकीचा निकाल (Results) जाहीर होईल. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता असतानाच सट्टेबाजांनी (Betting) काँग्रेसवर (Congress) पैसा लावला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी बुधवारी मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस सुमारे 120 ते 130 जागांसह मोठा विजय मिळवू शकते असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. सट्टेबाजांनी भाकित केलं आहे की भाजप जास्तीत जास्त 80 जागा जिंकेल, तर जनता दल-सेक्युलरला अर्थात जेडीएसला 37 जागा मिळतील असा अंदाज आहे.


हापूरच्या सट्टा बाजारातील एका सूत्राच्या माहितीनुसार काँग्रेसला 110 जागा मिळू शकतात, तर भाजपला 75 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर फलोदी सट्टा मार्केटशी संबंधित लोकांनी सांगितलं की काँग्रेसला 137 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला फक्त 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. फलोदी सत्ता बाजारने जनता दल-सेक्युलरला 30 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.


पालनपूर सट्टा बाजारानुसार काँग्रेसला 141 जागा मिळतील


पालनपुर सट्टा बाजाराच्या मते, काँग्रेसला 141 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 57 जागा मिळण्याचा अनुमान आहे. जेडीएलला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी काँग्रेससाठी अनुकूल निकाल आणि प्रतिस्पर्ध्यांवर महत्त्वाची आघाडी दर्शवतात. एकूणच, 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसला 120 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे. भाजपला 70 ते 80 जागा मिळू शकतात, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.


विविध पोलमध्येही काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज


आतापर्यंत घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विविध निवडणुकांमध्येही काँग्रेस भाजपपेक्षा पुढे असल्याचं दिसून येत आहे. एबीपी न्यूज-सी व्होटरने काँग्रेसला जास्तीत जास्त 112 जागा मिळतील म्हणजेच बहुमतापेक्षा एक जागा कमी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. झी न्यूज मॅट्रीज 118 जागा, टाइम्स नाऊ-ईटीजी 113 जागा, TV9 भारतवर्ष-पोलस्ट्रॅट 109 जागा बहुमतापेक्षा 4 कमी, रिपब्लिक टीव्ही-पी मार्क 108 जागा बहुमतापेक्षा 5 जागा, सुवर्ण न्यूज-जन की बात 106 जागा 6 कमी आहेत. बहुमतापेक्षा, आणि न्यूज नेशन-सीजीएसने काँग्रेसला सर्वाधिक 86 जागांचा अंदाज वर्तवला आहे. या पोलनुसार काँग्रेसला एकतर बहुमत मिळेल किंवा ते बहुमताच्या जवळपास पोहोचू शकेल.


हेही वाचा


Karnataka Exit Poll: कर्नाटकात कुणालाही बहुमत नाही... कुमारस्वामी पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत येणार? वाचा एक्झिट पोल काय सांगतोय