बिदर : गुरु शिष्याच्या नात्याची थोर परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. पण आता काळ बदलला असल्याने विद्यार्थी आणि गुरुजनांमध्ये आधीसारखं नातं राहीलं नाही असं बोललं जातं. पण गुरु शिष्याच्या नात्यातलं पावित्र्य, प्रेम आणि निरागसता दाखवणारी एक घटना कर्नाटकच्या बिदरमध्ये घडलीय. जी ऐकून तुम्हालाही तुमच्या लाडक्या शिक्षकांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लाडक्या गुरुजींच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांच्या बांध फुटला. बिरप्पा कडलीमत्ती असं त्या गुरुजीचं नाव आहे.
बिरप्पा कडलीमत्ती हे मूळचे बागलकोटचे. ते बिदर जिल्ह्यातील एकलारा या खेडेगावातील सरकारी शाळेत गेल्या 13 वर्षांपासून ते इंग्रजी शिकवतात. बिरप्पा कडलीमत्ती स्काऊड गाईडही होते. बिरप्पा कडलीमत्ती गुरुजींचा विद्यार्थ्यांना लळा लागला होता. सरकारी शाळेत सेवा बजावल्यानंतर त्यांच्या बदलीचे आदेश आले आणि निरोप समारंभात विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला.
बिरप्पा कडलीमत्ती गुरुजींच्या पायावर डोकं ठेवून विद्यार्थी ओक्साबोक्शी रडत होते. विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा निरोप घेताना बिरप्पा गुरुजींचाही शाळेतून पाय निघत नव्हता. बिरप्पा कडलीमत्ती गुरुजींनी विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणाचे धडे दिले नाहीत तर विद्यार्थ्यांना घडवलंही. गुरु-शिष्याचं हे नात आजकाल फारच कमी पाहायला मिळतं.
बिदरमधली ही बातमी वाचून कदाचित तुम्हालाही तुमचे आवडते गुरुजी आठवतील हे नक्की. बिरप्पा कडलीमत्तींकडे पाहून एवढंच म्हणू शकतो असे गुरुजी होणे नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- जपान आणि भारतीय लष्कराचा संयुक्त सराव बेळगावात होणार, जपानी लष्करी अधिकाऱ्यांची बेळगावला भेट
- Karnataka : फिल्मी स्टाईल रेड, 500... 2000 रुपयांच्या नोटाच नोटा; पण कुठे? तर पाण्याच्या पाईपलाईनमध्ये
- Karnataka : बलात्काऱ्याला शिक्षा काय? कर्नाटकातील महिला आमदार म्हणाल्या- बलात्काऱ्याचे खच्चीकरण करा...