Karnatak Bandh : महाराष्ट्र एकीकरण समितीवर (Maharashtra Ekikaran Samiti) बंदी घालावी या मागणीसाठी कन्नड संघटनानी 31 डिसेंबर रोजी बंदची हाक दिली आहे. बंगळुरु येथे तीसहून अधिक कन्नड संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. कन्नड संघटनेचा वाटाळ नागराज याने बैठक झाल्यावर सगळ्या कन्नड संघटनांच्या वतीने बंदची घोषणा केली. सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपूर्ण राज्यात बंद पाळण्यात येणार आहे.अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. 31 डिसेंबरच्या बंदमध्ये सगळ्यांनी सहभागी होवून यशस्वी करावा. आजवरच्या बंद पेक्षा हा बंद वेगळा आहे .कन्नड जनतेच्या स्वाभिमानाचा विषय आहे असेही वाटाळ नागराज म्हणाला.


कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीच्या हालचाली
सीमाभागात मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. कर्नाटक सरकारने याबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कायद्याच्या चौकटीत चौकशी करुन याबाबत निर्णय घेतला जाईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केलंय.  


कर्नाटक सरकारने (Karnataka Government) मराठी संस्था बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे. हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली होती. कर्नाटकात मराठी भाषिकांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोपही केला होता.  बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिलं होतं. महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी बांधवांच्या पाठिशी असल्याचं शिंदे म्हणाले होते. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी बांधवांवर  अन्याय  होत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशीही मागणी त्यांनी केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या
 
...ही तर लहान-सहान घटना, त्यावरुन कायदा मोडणाऱ्यावर कारवाई करणार; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य


Eknath Shinde : सीमाभागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय


Karnatak CM Bommai: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे संकेत, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी?