Rajasthan Bride Dowry : मुलींच्या शिक्षणाला चालना मिळण्यासाठी राज्यस्थानमधील एका नववधुने पुढाकार घेतला आहे. आपल्या हुंड्याची निर्धारित रक्कम मुलीचं हॉस्टेल तयार करण्यासाठी खर्च करण्याची विनंती त्या मुलीनं वडिलांना केली होती. वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या मुलीची इच्छापूर्ती केली. मुलीच्या वडिलांनी 75 लाख रुपयांचा चेक मुलीच्या हॉस्टेल निर्मितीसाठी देऊ केलाय. राजस्थानमधील या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून नवरीचं कौतुक केलं जात आहे. 


राजस्थानमधील बाडमेर शहरातील किशोर सिंह कनोद यांची मुलगी अंजली हिचा विवाह 21 नोव्हेंबर रोजी प्रवीण सिंह यांच्यासोबत झाला. दैनिक भास्कारमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तानुसार, अंजलीने लग्नाआधी वडिलांना विनंती केली केली, हुंड्यातील रक्कम मुलीच्या हॉस्टेल निर्मितीसाठी वापरण्यात यावी. किशोर सिंह कनोद यांनीही मुलीच्या इच्छानुसार 75 लाख रुपये दान केले. किशोर सिंह कनोद यांच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. बाडमेर येथील रावत त्रिभुवन सिंह राठौर यांनी वृत्तमान पत्रात छापून आलेली बातमी ट्वीटरवर पोस्ट केली आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय.  






रिपोर्ट्सनुसार, अंजलीने लग्नाच्या विधी पूर्ण केल्यानंतर एका पत्राद्वारे आपली इच्छा व्यक्त केली. हे पत्र लग्नात सर्वांसमोर वाचण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या. भावूक झालेल्या वडिलांनी चेकद्वारे रक्कम दान केली. जवळपास 75 लाख रुपयांची रक्कम मुलीचं हॉस्टेल तयार करण्यासाठी देण्यात आली. अंजलीच्या या निर्णयाचं सर्वच स्थरातून कौतूक होत आहे. अंजलीचे वडिल किशोर सिंह कनोद यांनी राष्ट्रीय महामार्ग 68 वर होत असलेल्या वस्तीग्रह निर्मितीसाठी याआधीच एक कोटी रुपये अनुदानाटी घोषणा केली होती. पण या हॉस्टेलच्या निर्मितीसाठी 50 लाख ते 75 लाख रुपयांची रक्कम अद्याप आवशक होती. मुलगी अंजलीला ही बाब समजली होती. त्यानंतर अंजलीने पैसे देण्याची विनंती वडिलांना केली. त्यानंतर वडिलांनी क्षणाचाही विलंब करता आणखी 75 लाख रुपये दान केले.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha