Kanpur News कानपूर : कानपूरमध्ये सातत्यानं रेल्वे ट्रॅकवर वस्तू ठेवत मोठा अपघात घडवण्याचा प्रयत्न फसला आहे. कानपूर ते शिवराजपूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर ठेवून त्याचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेनं मोठं संकट टळलं.प्रयागराजमधून भिवनैसाठी जाणाऱ्य कालिंदी एक्स्प्रेसच्या लोको पायलटच्या सतर्कतेनं मोठं संकट टळलं. रेल्वे ट्रॅकवर एक एलपीजी गॅस सिलेंडर उलटा ठेवला होता. त्यानुसार सिलेंडर स्फोट करुन रेल्वे उडवण्याचा प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.


कानपूर सेंट्रल पासून 30 किलोमीटर अंतरावर शिवराजपूर भागात हा प्रकार उघडकीस आला. रेल्वे चा हा भाग बरेली मंडळाच्या कक्षेत येतो. रविरात्री रात्री साडे आठच्या सुमारास कालिंदी एक्स्प्रेस तिथून जात असताना स्फोट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. एलपीजी गॅस सिलेंडर, काचेच्या बाटलीत ज्वलनशील पदार्थ आणि पांढर्‍या रंगाचं रसायन देखील सापडलं आहे. या एक्स्प्रेसच्या लोको पायलटनं सिलेंडर पाहून इमरजन्सी ब्रेक लावला, मात्र ट्रेन वेगात असल्यानं ती सिलेंडरला धडकली, या धडकेत सिलेंडर बाजूला जाऊन पडला. या धडकेनंतर सिलेंडर न फुटल्यानं अनेकांचा जीव वाचला.  


चौकशी सुरु


या घटनेनंतर ट्रेन एक तास थांबवण्यात आली आणि अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. या ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित होते मात्र त्यांच्यामध्ये भीतीचं वतावरण निर्माण झालं होतं. जीआरपी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी सिलेंडर, केमिकल भरलेली बाटली आणि पांढरी पाऊडर जप्त केली आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून चौकशी सुरु करण्यात आली होती. घटनास्थळी फॉरेन्सिक आणि डॉग स्कॉड देखील बोलावण्यात आलं. पोलीस आयुक्त हरीश चंद्र यांनी या मध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचं म्हटलं. रेल्वे लाईन सुरु असून ट्रेन रवाना झाल्याचं म्हटलं. या घटनेचा सर्व बाजूनं तपास करण्यात येणार असल्याचं हरीश चंद्र यांनी म्हटलं. 
 
काही दिवसांपूर्वी गुजैनी रेल्वे ट्रॅकवर 40 फुट उंचावरुन एक ट्रक पडला होता. त्या मार्गावरुन चित्रकूट एक्स्प्रेस जाणार होती. त्यापूर्वी गोविंद पुरी स्टेशन जवळ गोविंद पुरी स्टेशन जवळ साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे घसरले होते.


इतर बातम्या :


विधानसभा निवडणूक गाजणार! राहुल गांधी, प्रियांका गांधीच्या राज्यात झंझावाती सभा, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार


गुजरात एसीबीची धडक कारवाई, मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला अटक, 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप