मुंबई : गुजरात एसीबी (Gujarat ACB) पथकाने मुंबईत (Mumbai) मोठी कारवाई केली आहे. राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील अधिकाऱ्याला 10 लाखांची लाच (Bribe) स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, माटुंगा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास दिगंबर पगार यांनी 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी संबंधिताने गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून गुजरात एसीबीने सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर पगार यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. 


10 लाखांची लाच स्वीकारताना जाळ्यात


गुजरातच्या राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी दिगंबर पगार यांनी लाच मागितली होती. दिगंबर पगार यांना गुजरात एसीबी पथकाने 10 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या प्रकारणी पगार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस दलाकडून दिगंबर पगार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


CGST Mumbai : सीबीआयने मुंबईत लाचखोर सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; 60 लाखांची लाच मागितली, 30 लाख हवालाकडून घेतले


Nashik Bribe News : मुंबई CBI पथकाची नाशिकमध्ये मोठी कारवाई, वरिष्ठ विपणन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ