Kangana Ranaut : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. कंगनाने केलेले वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच गाजत असते. वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या कंगना रनौतने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शीख समुदायातील लोक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कंगना रनौतच्या मुंबईतील खारमधल्या घरासमोर शीख समुदायाकडून निदर्शने करण्यात आली आहेत. त्यासोबत कंगनाविरोधात नारेबाजी देखील करण्यात आली. कंगनाला मुंबईतूनच नव्हे तर राज्यातून हद्दपार करा अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात येत आहे. कंगनाविरोधात रविवारी शीख समुदायाकडून मुलुंडमधील पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. सोमवारी देखील खार पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात शीख समुदायाच्या वतीनं तक्रार नोंदवली जाणार आहे.
कंगनाकडून इंदिरा गांधींची प्रशंसा करताना संपूर्ण शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने नुकतच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कंगनाचे ट्विटर अकाउंट हटवण्यात आले असले तरीही ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची मतं व्यक्त करताना दिसते. कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिलेले,"संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी देश आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन".
संबंधित बातम्या
Kangana Ranaut On Farm Laws : कंगना रनौत पुन्हा बरळली, मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याने कंगना भडकली
Dhanbad District Court: कंगना रनौत, सलमान खुर्शीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Avadhoot Gupte : विक्रम गोखलेंना पाठिंबा दिल्याप्रकरणी अवधूत गुप्तेवर टीका, अवधूत गुप्तेने फेसबूक पोस्ट लिहित केला खुलासा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha