Avadhoot Gupte : मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वकत्व्याचे समर्थन केले. त्यानंतर विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले. परंतु स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले ठाम आहेत. खरं स्वातंत्र्य 2014 पासूनच मिळालं यावर ते ठाम असून ते बदलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अशातच अवधूत गुप्तेने विक्रम गोखलेंना पाठिंबा दिल्याप्रकरणी त्याच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यासंदर्भात आता अवधूत गुप्तेने फेसबूक पोस्ट लिहित खुलासा केला आहे. 


फेसबुक पोस्टमध्ये अवधूत गुप्तेने लिहिले आहे,"मी यावर बोलू इच्छित नाही. कारण ते वडिलांच्या ठिकाणी आहेत. मराठी चित्रपटसृष्टी हे आमचे कुटुंबच आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही 'अशोक मामा', 'विक्रम काका' अशाच नावांनी हाका मारतो. ते काहीही बोलले तरी मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे. याचा अर्थ ते जे काही बोलताता ते सर्व आम्हास पटते असा अजिबात होत नाही. परंतु पटले नाही म्हणून तोंड वर करून सांगणे योग्य ठरेल काय?"


विक्रम गोखलेंच्या विधानावर अवधूत गुप्ते म्हणाला,"विक्रम गोखलेंनी त्यांच्या काळात नाटकापासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या कलेने मराठी रसिक वर्ग घडवला आणि वाढवला आहे. ज्या झाडाची फळे आज आम्ही चाखत आहोत. त्यांचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी उतारवयात केलेले एखादे वक्तव्य हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत आणि कमवलेला सन्मान केराच्या टोपलीत टाकू शकत नाही".


संबंधित बातम्या


Vikram Gokhale : 2014 पासूनच खरं स्वातंत्र्य मिळालं यावर ठाम, ते बदलणार नाही : विक्रम गोखले


एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांची बैठक संपली; कोणताही तोडगा नाही


Swachh Survekshan 2021 : 'सिटिझन फीडबॅक'मध्ये हिंगोली नगरपरिषद देशात प्रथम, कचरा व्यवस्थापनासाठी पश्चिम विभागांमध्ये तिसरा क्रमांक 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha