Cases Registered Against kangana Ranaut and Salman Khurshid: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि काँग्रेस नेता सलमान खुर्शीद यांच्याविरोधात झारखंडच्या धनबाद जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंगनानं देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. तिच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जातोय. तर, सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिदुत्वावर टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. दोघांनी जनभावना दुखावल्याचा आरोप करत न्यायालयाला कारवाईची विनंती करण्यात आलीय. धनबाद जिल्ह्यात दोघांविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.
धनबादच्या पांडरपाला येथील निवासी इजहार अहमद उर्फ बिहारी यांनी कंगना रनौतविरोधात जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली. कंगाननं केवळ देशातील लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या हौताम्याचा आणि बलिदानाचा अवमान केला नाही. तर, तिच्या वक्तव्यामुळं देशाची मान खाली गेली आहे. या वक्तव्यावर भाजप नेते वरुण गांधी यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत हा देशद्रोहाचा गुन्हा असल्याचं तक्रारीत म्हटलंय. 20 नोव्हेंबरला कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे, झरिया येथील रहिवासी असलेले वकील शिव कुमार यांनी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्याविरोधात धनबाद न्यायालयात तक्रार दाखल केली. सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिदुत्वाची तुलना इस्लामिक संघटना बोको हराम आणि दहशतवादी संघटना आयसीसशी केल्याची त्यांच्यावर आरोप आहे. यामुळं धार्मिक भावना दुखवल्या आहेत. खुर्शीद यांनी पुस्तकात लिहिलेल्या वाक्यामुळं दोन पंथांमधील सलोखा बिघडवण्याचा कट रचल्याचं फिर्यादीत म्हटलंय. एवढेच नव्हेतर, खुर्शीदच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी तक्रारीत केलीय. या प्रकरणी 18 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Preity Zinta Blessed with Twins: प्रीती झिंटा आई झाली, 46 व्या वर्षी जुळ्यांना जन्म, मुलाचं नाव जय, मुलीचं नाव काय?
- Vicky Kaushal Propose Katrina : 'मुझसे शादी करोगी' सलमानसमोरच विकीनं केलं कतरिनाला प्रपोज ; मग पुढे जे झालं ते...
- दाक्षिणात्य सुपरस्टार Suriya कोट्यवधींचा मालक; राजाप्रमाणे जगतोय आयुष्य, संपत्ती ऐकून व्हाल अवाक्